गडब/सुरेश म्हात्रे
🔺 वडखल परिसरात सुरू असणारे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र तात्कालीन पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांची रेल चेल केली आहे. या परिसरात सुरू असणारे मटका जुगार दारू भंगार व्यवसायिक यांचे जाले पसरले असून त्या प्रत्येकाकडून मोठ्या प्रमाणात माया जमली जात होती. यामुळे या परिस्थितीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते ते बंद करायला कोणते प्रकारे थारा नव्हता.
या परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू विकली जाते, तसेच परप्रांती यांचे भंगार व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात बरकत मिळत आहे, मटक्याच्या धंद्यामुळे येथील तरुण देशोधडीला लागले आहेत. तसेच वृद्ध आणि तरुण मुले वामार्गाला लागली आहेत.
नूतन पोलीस निरीक्षक यांनी या बाबींचा विचार करून वडखळ परिसरात सुरू असणारे अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी या परीसातून जोर धरित आहे.