गडब/सुरेश म्हात्रे
♦️रायगड जिल्ह्यात स्वतःच्या कर्तृत्त्वाने व दातृत्त्वाने सतत चर्चेत असलेले भाजप पेण सुधागड रोहा विधानसभा निवडणूक प्रमुख प्रसाद भोईर यांचा त्यांच्या नेहमी सर्वांना करत असलेल्या परमार्थिक सेवेकरीता शिहू-बेणसे-नागोठणे परिसरातील वारकरी सांप्रदायातील भाविकांनी एकत्र येत त्यांना विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा देत आदरपूर्वक सत्कार केला. गावागावातून निघणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या दिंड्याना प्रसाद भोईर यांचे सढळ हस्ते योगदान असते यामुळे संपूर्ण वारकरी सांप्रदायातर्फे एकत्रित प्रसाद भोईर यांचे आभार व्यक्त करत सत्कार करण्यात आला.
सदर सत्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रसाद भोईर
यांनी वारकरी संप्रदायाचे ते करत असलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून वारकरी सांप्रदायाच्या सेवेतून प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा करण्याची संधी प्राप्त होत असल्याबद्दल सांप्रदायाप्रती ऋण व्यक्त केले.
आज राजकारणात बहुतांशी राजकारणी पैसे कमवण्याचे माध्यम म्हणून बघत असताना प्रसाद भोईर यांच्यासारखा तरुण नावाजलेला उद्योजक आपल्या कष्टाच्या कमाईतून आपण या समाजाचे व मातीचे काही देणे लागतो या भावनेतून समाजातील सर्व घटकांच्या सामाजिक कार्यांना, क्रिडा स्पर्धांना व गोरगरिबांना आडिअडचणीत सढळ हाताने मदत करत असतो याचं सर्वसामान्यांमध्ये मोठं कौतुक होत आहे