Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

इस्त्रोची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिमानास्पद कामगिरी; 'एक्सपोसॅट' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण*

Responsive Ad Here
💥💥 ब्रेकिंग बातमी

✍️गडब / अवंतिका म्हात्रे

     *श्रीहरिकोटा-* नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सन २०२४ च्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 
     आज सोमवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पीएसएलव्ही (PSLV C58) रॉकेटच्या मदतीने XPoSat उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. पुढे सुमारे 22 मिनिटांमध्ये उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित झाला. सदर उपग्रह अंतराळातील प्रमुख प्रकाश स्त्रोत तसेच कृष्णविवरे यांचा अभ्यास करणार आहे. पीएसएलव्ही उपग्रह ६ डिग्री अँगलला प्रस्थापित करण्यात आलाय. पृथ्वीपासून सुमारे ६५० किलोमीटर उंच अंतरावर हा उपग्रह आहे. सध्या उपग्रह ज्या रॉकेटनेवर पाठला आहे त्याची कक्षा कमी करण्यात आलीये. पुढे आणखी काही वेळासाठी ही मोहीम सुरू राहणार आहे.
      तिरुअनंतपुरम येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने देखील एक उपग्रह विकसीत केला आहे. हा उपग्रह देखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आला आहे. अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे आणि सौर विकिरण असा या उपग्रहाचा मुख्य उद्देश्य आहे. साल २०२४ मधील पहिलीच मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2017 मध्ये इस्रोनं हे अभियान सुरू केलं होतं. या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे 22 मिनिटं, एक्सपोसॅट उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात केला जाईल. या उपग्रहामध्ये दोन पेलोड्स आहेत. पहिला - पोलिक्स आणि दुसरा - एक्सपेक्ट पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे. हे रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटर यांनी PPO तयार केले आहे. 126 किलो वजनाचे हे उपकरण अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करेल. हे 8-30 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. पोलिक्स अवकाशातील 50 पैकी 40 तेजस्वी वस्तूंचा अभ्यास करेल.
XSPECT म्हणजे, एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि वेळ. ते 0.8-15 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. म्हणजेच, ते पोलिक्सच्या श्रेणीपेक्षा कमी ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. हे पल्सर, ब्लॅक होल बायनरी, कमी-चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे, मॅग्नेटार इत्यादींचा अभ्यास करेल.भारतीय अंतराळ एजन्सी ISRO व्यतिरिक्त, यूएस स्पेस एजन्सी NASA ने डिसेंबर 2021 मध्ये सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता. इस्रोने सांगितले की, क्ष-किरण ध्रुवीकरणाचा अवकाश-आधारित अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरत आहे आणि या संदर्भात EXPOSACT मिशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
 *न्यूजमंत्रा*