गडब / सुरेश म्हात्रे
पेण येथील मुद्रांक विक्रेते तसेच पुनम गुप्ता फसवणूक प्रकरणातील जामीनावर असणारे हबीब खोत यांना पकडण्यात पोलिस असमर्थ ठरत आहेत. याच गुन्ह्यातील आरोपी हसिबुर रेहमान हे अटक आहेत. हबीब खोत हे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धावत आहेत, असे असतानाही ते पोलीसांना का दिसत नाहीत असा सवाल सर्वसामान्य जनता करत आहेत. या गुन्हयातील फिर्यादी अकील पठाण याने हसिबुर रेहमान याला मौजे अंबेघर येथील जमिनीच्या खरेदीसाठी २० हजार रुपये दिले होते. या व्यवहाराची खोटी कागदपत्रे सय्यद याने तयार केली होती. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी रेहमानला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु खोत हा पेण शहरात खुलेआम फिरून देखील पोलीसांच्या हातात लागत नाही. त्यामुळे कळत नकळत सर्व सामान्य नागरिक पोलीसांकडे संशयाने पाहत आहेत.
हबीब खोत यांची शोध मोहिम आम्ही सुरू ठेवली आहे. आम्ही न्यायालयाच्या बाहेर देखील त्याला ताब्यात घेण्याच्या दृष्टिने सापळा रचला होता. परंतु तो तेथे आला नाही. माझ्याजवळील तपास आता वर्ग करण्यात आला आहे. परंतु लवकरच हबीब खोत याला आम्ही ताब्यात घेउन अटक करू, असे पोलिस उपनिरीक्षक आर. आर. भोर यांनी सांगितले.