गडब / अवंतिका म्हात्रे
अल्पवयीन मुलीचे अब्रूचे रक्षण केल्या बद्दल शिवभक्त यश पाटील यांचे अलिबाग मुरुड चणेरा मतदार संघाचे आ महेंद्र शेठ दळवी यांनी गौरव केला.
रेवस -कार्लेखिंड रस्त्यावरील कामार्ले येथे सकाळी ११च्या सुमारास ज्युनियर कॉलेज मधील अल्पवयीन मुलीला एक रिक्षाचालक(इकोगाडी)वाला बळजबरीने अलिबाग ला घेऊन जात होता व तिच्या सोबत अश्लील चाळे करत होता म्हणून त्या मुलीने भरधाव रिक्षातून दरवाजा उघडून आपला जीव वाचविण्या उडीमारली . त्याच वेळी यश पाटील हा गाडी घेऊन अलिबाग कडे जात असताना मुलीने गाडीतून उडी मारली हे निदर्शनास आले . म्हणून त्याने त्या मुलीच्या दिशेने धाव घेत त्या मुलीची विचारपूस केली असता तिने आपल्या सोबत घडलेली हकीगत सांगितली ही हकीगत कळताच यश पाटील याने त्या रिक्षा चालकाचा पाठलाग करून त्यास पकडले व स्थनिक नागरिकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले.अश्या प्रकारे यश पाटील याने त्या मुलीच्या अब्रूचे रक्षण केले. या कार्याची दखल घेत शिवभक्त यश रत्नाकर पाटील यांचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी शाबासकी देत गौरव करण्यात आला.तसेच स्थानिक ग्रामस्थांनी देखील त्याच्या कार्याचं कौतुक केले.