गडब/ सुरेश म्हात्रे
पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असून , गेली कित्तेक महिने रग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना औषधे खरेदी करण्यासाठी खाजगी मेडीकलचा अधार घ्यावा लागत आहे . रुग्नालयाची अवस्था अतिशय बिकट झाली असून धुळ खात असलेली अग्नीषमक आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे . कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण ?असे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदिप ठाकुर यांनी रुग्नालय प्रशासनाला जाब विचारला आहे
या दवाखान्यात प्रस्तुती केंद्रात पुर्णवेळ स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध नसल्याने महिला रुग्नांची अवस्था बिकट झाली आहे . येथे तज्ञ डॉक्टराचा तुटवडा असल्याने येथील रुग्नांना अलिबाग येथे उपचारासाठी जावे लागत आहे . सदर बाब अति खर्चिक असल्याने रुग्नांच्या नातेवाइकांना अधिक भुर्दंड सोसावा लागत आहे . तसेच सर्प दंशावर अॅन् टी वीनो इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्नांना आपले प्राणही गमवावे लागत आहे . तसेच अॅम्ब्युलन्स व्यवस्था असूनही त्यावर चालक नसल्याने रुग्नांच्या नातेवाईकांना खाजगी रुग्णवाहीका करावी लागत आहे . रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी गार्डन खुले करावे . जे बाक आहेत त्यावर कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे रुग्नांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे .
सदर रुग्नालय हे भ्रष्टाचाराने पोखरले असून, या बाबत संदिप ठाकुर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे . याबाबत पेण रुग्नालयाचे अधिक्षक संध्या राजपुत यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे . यावेळी संदीप ठाकुर सह जनार्दन पाटील आणि म . न .से .पदाधिकारी हजर होते . त्यांनी आक्रमक भुमीका घेतल्याने रुग्नालय प्रशासनाचे धाबे दनानले आहेत .