Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन गडब मध्ये उत्साहात साजरा!♦️

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गडब मधील ग्रामपंचायत काराव (गडब) च्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्याची जाणीव मनात अदोरेखित करणारा तिरंगा डौलाने फडकविण्यात आला.
    सदर स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गडबच्या सरपंच सौ.मानसी मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.पुढील येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी नेमकी काय किंमत मोजावी लागली याची जाणीव सौ.मानसी म्हात्रे यांनी करून दिली.यावेळी उपसरपंच सौ.भाग्यश्री कडू सह सर्व सदस्य व सदस्या उपस्थित होते.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक स्वातंत्र्य सैनिक पत्रकार बंधू उपस्थित होते.