Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

मालकीच्या जमिनीत भातपेरणी आणि लावणी केल्याने जे . एस . डब्ल्यू च्या दलाला विरुद्ध गुन्हा दाखल .

Responsive Ad Here



गडब / अवंतिका म्हात्रे .

          पेण तालुक्यातील जे एस डब्ल्यू स्टील लि डोलवी कंपनीने खार माचेला हददीतील जमिणी पिकत्या दाखवण्यासाठी शक्कल लढवली आहे . अशातच कंपनीने आपल्या दलालांमार्फत खार - माचेला हददीत ज्यांनी कंपनी ला जमिन विकली अशांच्या जमिनीत व ज्यांनी जमिन अद्याप ही कंपनी ला विकलेली नाही अशांच्या जमिनीत बेकायदेशीर पेरणी आणि लावणी केलेली आहे .

       

            यासंदर्भात येथिल पत्रकार सुरेश म्हात्रे यांची जमिन सर्वे नं ७९ / १ अशी खार - माचेला हददीत असून सदर जमिन त्यांनी कंपनीला विकलेली नाही तरीही कंपनीचे दलाल तुळशीदास बामजी कोठेकर यांनी भात पेरणी व लावणी केलेली आह स्वतः च्या मालकीच्या जमिणीत जे एस डब्ल्यू कंपनीला आणि त्यांच्या दलालांना भात पेरणी करण्याचा अधिकार दिला कुणी असा सवाल पत्रकार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे . या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधींनी तुळशीदास कोठेकर यांच्याशी संपर्क साधला असता मी भात पेरणी केली आहे परंतू ती मी काढून देतो असे आश्वासन दिले होते . मात्र १ महिन्याहून अधिक कालावधी झाला तरी भात पेरणी काढलेली नाही . तद नंतर पत्रकार म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी वडखळ पोलीस्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तेथिल अंमलदार शिंदे यांनी सविस्तर वृत्तांत ऐकून आरोपी तुळशीदास बामजी कोठेकर याच्या विरुदध कलम ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार शिंदे अधिक तपास करित आहेत .