*गडब / अवंतिका म्हात्रे*
मान अभिमान विकास फाउंडेशन तथा ऑलिम्पिकवीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती यांच्या वतीने सन २०२३ या वर्षातील राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ कराड सातारा या ठिकाणी नुकताच पार पडला. दि. २३ जुलै १९५२ साली आपल्या स्वतंत्र भारताला पाहिले ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा जाधव यांनी हेलसिंगी ऑलम्पिक मध्ये मिळवून दिले आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहासाची आणि कर्तृत्वाची पुनरावृत्ती केली. याच दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार वितरण करण्यात येते या मध्ये देशातील नामवंत खेळाडू, मार्गदर्शक, संघटक यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
रायगड जिल्हातील खोपोलीचे जगदिश मरगजे यांना"ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार २०२३" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगदीश मरागजे यांना रायगड भूषण, महाराष्ट्र राज्य आदर्श क्रीडा शिक्षक, कोयना भूषण, आधार महाराष्ट्र भूषण असे सन्मान यापूर्वी प्राप्त झाले असून विविध सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा संघटनांचे ते पदाधिकारी आहेत. क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात हॉकी इंडियाची आंतरराष्ट्रीय खेळाडू अक्षदा ढेकळे, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स खेळाडू स्रेहा जमदाडे, पहिला महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड, आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाल, राष्ट्रीय पंच विक्रम पवळे यांच्यासह एकूण २५ पुरस्कार्थीना हिंद केसरी दीनानाथ सिंह, क्रीडा व युवक कल्याण भारत सरकारचे यशवंत नामखेडकर, सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक डॉ शशिकांत डोईफोडे, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त पंढरीनाथ अण्णा पठारे, महाराष्ट्राचा तुफानी मल्ल माऊली जमदाडे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार | देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार वितरण समारंभ यशस्वी करण्यासाठी आशियाई सुवर्णपदक विजेते प्रा अमोल साठे, अरुण पिसाळ तसेच निवड समिती प्रमुख विनोद कदम यांनी मेहनत घेतली.
