गडब/अवंतिका म्हात्रे
🔰 पेण तालुक्यातील गडब गावात अनधिकृत बांधकामाचे पेय फुटले असून, या अनधिकृत बांधकामा मुळे संपूर्ण गडब या गावाला अवकाला प्राप्त झाली आहे. गडब गावात कोणतेही वाहन जात असताना दिव्य करावे लागत आहे. वाहन चालकांना महामार्गातून वाटावी काढावी लागत आहे. हे करत असताना वाहनांचा धक्का लागून मोठी हानी होण्याचा धोका संभवत आहे. गावात दोन रास्त भाव धान्य दुकाने आहेत दुकानात येणाऱ्या धान्यांच्या गाड्यांना मोठी कसरत करून दुकानापर्यंत गाडी न्यावी लागते . ग्रा प . हद्दीतील रस्ता दिवसेंदिवस अरूंद होत चालला आहे .
गडब गावात गेले कित्येक वर्षापासून या अनाधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. जस - जशी वर्ष जातात तस तशी बांधकामाचे नूतनीकरण होताना दिसत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली असता कोणतेही उत्तर मिळत नाही. संबंधित बांधकामा बाबत नवनिर्वाचित सरपंच मानसी पाटील यांच्याकडे तक्रार केले असताना बघतो करतो अशी उत्तरे मिळाली आहेत . या बाबत येथील पत्रकार सुरेश म्हात्रे यांनी जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
