*गडब / अवंतिका म्हात्रे*
पेण वरून भाल गावाला जाणारी प्रवाशांंनी भरलेेली एस.टी बस कलंडली समोरून येणाऱ्या गाडीला मार्ग देताना साईड पट्टी वरून कलंडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून एसटी पलटी झाली नाही. त्यातील प्रवासी व ड्रायव्हर कंडक्टर बचावले.
दरम्यान, पेण स्थानकातून दुपारी १ : ३० च्या सुमारास एस. बस क्र. एम.एच. २० बी. एल. २२३४ हि बस चालक सी. एस. अंबोरे व वाहक सचिन पाशिलकर हे पेण ते भाल घेऊन जात होते. वढाव ते कान्होबा रस्ता दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनास साईड देताना चालकाने बस एका बाजूला घेतली असता रस्त्याची साईड पट्टी खचली व बस एका बाजूला कलंडली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराहट पसरली
यावेळी चालकाने व वाहकाने प्रसंगावधान दाखवीत बसमधील प्रवाश्यांना आपत्कालीन दरवाज्याच्या मार्गाने सुरक्षित रित्या बाहेर काढले. बचावलेल्या प्रवाशांनी परमेश्वराचे आभार मानत घरचा रस्ता धरला. कलंडलेल्या एसटीला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.
ग्रामीण भागातील रस्ते अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे व अनेकवेळा पाईपलाईन टाकण्यासाठी, केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदकाम केले जाते. व व्यस्थित रित्या भराव केला जात नाही यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खचल्याने अश्या घटना घडत आहेत.

