Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

शिवसेना उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांना पितृशोक

Responsive Ad Here



गडब / अवंतिका म्हात्रे


    पेण तालुक्यातील हनुमानपाडा गावचे सुपुत्र, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांचे वडील, निवृत्त कस्टम पोलीस कर्मचारी स्व.वासुदेव महादेव पाटील यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले.

    अत्यंत चांगला स्वभाव, उच्च विचारसरणी आणि आपल्या कामात प्रामाणिकता हे स्व.वासुदेव पाटील यांची वैशिष्ट्ये होते. त्यांनी आपल्या वयाची 35 वर्षे 'कस्टम पोलीस' म्हणून सेवा बजावली. मुंबई, पनवेल, वडखळ, अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा जेटी येथे सेवा बजावत असताना वडखळ जेटी येथे ते सेवा निवृत्त झाले.

    स्व.वासुदेव पाटील यांच्या पश्चात त्यांना पत्नी गं.भा.नंदा पाटील, मुलगा रुपेश पाटील, निकेश पाटील, मुलगी विद्या पाटील (महाराष्ट्र पोलीस) तसेच सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  स्व.वासुदेव पाटील यांच्या निधनानंतर अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी, रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते वैकुंठशेठ पाटील, शेकाप महिला नेत्या स्मिता प्रमोद (पिंट्याशेठ) पाटील, पोलीस निरीक्षक मांडवा गोविंद पाटील, रायगड जिल्हा युवासेना प्रमुख संजय म्हात्रे, रायगड जिल्हा समन्वयक बाळा म्हात्रे, शिवसेना उप जिल्हाध्यक्ष भरत बोलेसो, मुरुड तालुका प्रमुख रुषीकांत डोगरेकर, मुरुड जेष्ठ नेते सीएम पाटील, पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, पेण तालुका प्रमुख तुषार मानकावळे, महिला शहर प्रमुख वंदना पाशिलकर, उद्योजक अनिल डाकी, दिपक म्हात्रे, बँक मॅनेजर फडतरे, अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, जेष्ठ पत्रकार सुनिल पाटील, निरंजन पाटील, कस्टम अधिकारी, पेण मधील डॉक्टर, वकील, उद्योजक, समाजसेवक, राजकीय नेते, पत्रकार, ओरियन सोसायटी सदस्य आदींनी रुपेश पाटील यांची हनुमानपाडा येथील त्यांच्या राहत्या घरी भेट घेऊन सांत्वन केले.