Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण - जिते येथील 12 वर्षीय ‘सारा’चा सर्प दंशानं मृत्यू ! योग्य उपचारा अभावी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ*

Responsive Ad Here

 

 *


गडब / अवंतिका म्हात्रे* 


 पेण तालुक्यातील जिथे येथील एका बारा वर्षीय मुलीचा सर्प दंशाने योग्य उपचारा अभावी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.

पेण तालुक्यातील जिते गावातील सारा ठाकूर 12 वर्षीय अल्पवयिन मुलीला मंगळवारी साप चावला होता. योग्य उपचारा अभावी तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे शासकीय रुग्णालयांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे सारा ठाकूर हिला मंगळवारी रात्री मन्यार जातीच्या विषारी सर्पने दंश केला. तिला उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे योग्य उपचार न झाल्याने साराच्या कुटुंबीयांनी तिला पेण येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सारावर उपचार करण्यास असमर्थता दर्शवली.

अखेर तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर कळंबोली येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र योग्यवेळी उपचार न मिळाल्याने सारा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सारा हिच्या मृत्येने जिते गावावर शोककळा पसरली आहे.