Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️गडबमध्ये प्लास्टिक बंदीचे तिन- तेरा,पिशव्यांचा सर्सास वापर, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष♦️

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

गडब गावातील संपूर्ण पंचकृषीमध्ये प्लास्टीक पिशव्यांचा सर्सास वापर होत असताना तालुका प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीचे प्लास्टीक बंदीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी प्लास्टीक बंदी जाहीर झाल्यानंतर दुकानदारांकडून प्लास्टिक जप्ती केली जात होती.
प्लॅस्टिक ज्या ठिकाणी स्टॉक करून ठेवले होते अश्या ठिकाणी धाडी टाकून दंडात्मक कारवाई देखील सुरू झाली होती. यावेळी प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद झाला होता परंतु,काही दिवसांनंतर ग्रामपंचायतीचे कारवाईकडे दुर्लक्ष करण्याचे धोर औलंबल्या नंतर नागरकांनी कापडी पिशव्या बंद केल्या होत्या. त्यामुळे सर्रासपणे सर्व दुकानदार दुकानात येण्याच्या मिऱ्हाईकांना प्लॅस्टीक पिशव्या देताना पहायला मिळतात.
  गडब ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्यात फेकलेल्या प्लास्टिकचा खच पडलेला आहे. मात्र, याबाबत आराठी ग्रामपंचायत किंवा श्रीवर्धन पंचायत समितीकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. प्लास्टिक पिशव्यांमुळे अनेकदा गटारे तुंबतात व पावसाळ्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. शासनाने बंदी जाहीर करूनसुद्धा केवळ ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू आहे. तरी पेण तालुका प्रशासन व गडब ग्रामपंचायत प्रशासनाने प्लास्टिक पिशव्यांवरती बंदी तातडीने लागू करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

गडब ग्रामपंचायतीत अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर सर्वाधिक साचणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याने प्लास्टिकबंदीची आरोळी राज्यस्तरावरून ठोकण्यात आली होती; पण ही प्लास्टिकबंदीची केवळ घोषणा ठरली आहे. श पेण तालुक्यातील गडब गावात या बंदीचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे, २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. मात्र, कारवाईबाबत ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. सदर प्लास्टीक पिशव्या मासळी विक्रेत्यांकडे सर्सास पणे आढळून येतात त्यावर गडब ग्रामपंचायतीकिडून कोणतीही कारवाई होत नाही