Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

⭕गावदेवी मातेचा यात्रोत्सव निर्विघ्पणे पार पडावा - सरपंच गणेश खरविले⭕

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

   दक्षिण रायगड जिल्ह्यात संपूर्ण होणाऱ्या यत्रांपैकी ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या सर्व धर्मीय समभावाचे प्रतिक म्हणून ओळख असलेल्या रोहा तालुक्यातील भातसई गावातील महादेवी यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. सदर यात्रोत्सवात भाविकांनी निर्विघ्नपणे यात्रोत्सवाला शुभारंभ करावा अशी अपेक्षा आदर्श गाव भातसई चे सरपंच गणेश दत्तात्रेय खरविले यांनी केली आहे.
      सदर यात्रोत्सवात पालखी सोहळा आदल्या दिवशी गावातून मंदिराकडे वाटचाल करीत असतो, तर दुसऱ्या दिवशी गावदेवी ची यात्रा भरवली जाते. गावदेविची यात्रा मुख्य मंदिराजवळ भरवली जाते.सादर यात्रेत लहान थोर मंडळींसह वृध्द,अपंग सहभागी होतात.सदर यात्रोत्सवाचे वैशिष्य म्हणजे गळ टोचणे होय. या दिवशी भक्तगण आपल्या पाठिला गळ टोचून घेतात. तो चित्तथरारक दृश्य पाहण्यासाठी तमाम नागरीक गर्दी करतात.
    या वर्षी तिथीनुसार ही यात्रा संपन्न होणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागीरी सह अनेक भक्तगण मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. सदर यात्रा शांततामय वातावरणात संपन्न करावी अशी मागणी आदर्श गाव भातसईचे सरपंच गणेश दत्तात्रेय खरविले यांनी केली आहे.