Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️पेणमध्ये पोलिसाकडूनच महिला पोलिसाचा विनयभंग;पोलीस हवालदार राजू पाटील याचे कृत्य♦️

Responsive Ad Here
गडब/अवंतिका म्हात्रे

गेली 17 वर्ष पेण उप विभागीय कार्यालयात कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजू उर्फ राजीव परशुराम पाटील याने त्याच कार्यालयात असणाऱ्या महिला पोलीस हवालदाराचा सतत दोन वर्षे विनयभंग केल्याने पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण उप विभागीय कार्यालयात पोलीस कार्यरत असणाऱ्या 42 वर्षीय महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्याच कार्यालयात गेली 18 वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजू पाटील उर्फ राजीव परशुराम पाटील, रा. मळेघर (वाशी नाका) याने 21 नोव्हेंबर 2021 पासून ते 2 जानेवारी 2023 च्या दरम्यान सतत 2 वर्ष सदर महिला पोलिसाचा विनयभंग केला आहे. सदर पोलीस हवालदार राजू पाटील याने सदर महिलेस सतत आय लव्ह यु बोलून तू मला हो बोल मी तुझा एटीएम होण्यास तयार आहे असे बोलून,वारंवार अश्लील बोलून, ओठांवर चुंबन करून दाखवून, फिर्यादीचे गालावर हात फिरवून लज्जा उत्पन्न केली. तसेच सदर महिला पोलीस कर्मचारी घरी परत जाताना नेहमीच पाठलाग करत गेली 2 वर्ष सदर महिला हवालदाराच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आहे.

सततच्या कृत्याला कंटाळून फिर्यादी महिला पोलिसाने वरिष्ठांकडे लेखी तक्रार केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने पेण पोलीस स्टेशन मध्ये कलम 354, 354(3)1, 4, 354(3), 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास रोहा उप विभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे ह्या करीत आहेत. पोलीस हवालदार राजीव उर्फ राजू पाटील हा गेली 17 वर्ष कायम एकाच जागी पेण उप विभागीय कार्यालयात कार्यरत असल्याने कायम दादागिरी करत असल्याने सदर पोलीस हवालदार राजू पाटील याला तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी असे फिर्यादी व पेण मधील महिलांनी मागणी केली आहे.