गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील कासू विभागातील गडब गावात रस्त्याच्या पलीकडे रेल्वे रुळाच्या पलीकडे गावठी दारू विक्रीचा धंदा करीत असतो.त्याच्याकडे सकाळ संध्याकाळ परप्रांतीयांचा व आदिवासींचा मोठा गलका दिसून येतो.याबाबत वडखळ पोलिसांना खडानखडा माहिती असूनही सदर इसमा विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने या गावठी दारू विक्रेत्याचे फावले आहे.
गडब गावात दारू विक्रीचे ७ ते ८ धंदे आहेत.या कासु विभागात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते.एकट्या गडब गावात दारू विक्रितीचे मोठे धंदे आहेत.त्यातच रस्त्याच्या पलीकडे हा इसम रात्री अपरात्री गावठी दारू विक्रितेचे धंदे करीत असतो.याबाबत वडखळ पोलीस ठाण्याचे बीट हवालदार यांना सखोल माहिती देऊनही कोणतीही कारवाई करत नाहीत.तरी जिल्हा पोलिस प्रमूख सोमनाथ घार्गे यांनी जातीने लक्ष घालून सदर इसमा विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी तमाम गडब वाशियांची मागणी आहे.