गडब / अवंतिका म्हात्रे
22 23 एप्रिल रोजी गुरुवर्य श्री ग.रा.चिकने गुरुजी प्रतिष्ठान खेड ,व दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने व प्यारा कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने महाराष्ट्रातील दिव्यांग कबड्डी खेळाडू यांच्या प्रोत्सानासाठी भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा चे आयोजन खेड तालुका रत्नागिरी येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून संघाने सहभाग घेतला होता .
या स्पर्धेत नागपूर संघाला 28 गुणांनी पराजित करून रायगड संघाने प्रथम क्रमांक पटकावला सहदेव बर्डे या खेळाडूने कर्णधार म्हणून काम बजावले तर मंगेश जाधव याने उपकर्णदार म्हणून जबाबदारी पार पाडली तसेच ओमकार महाडिक सचिन तांडेल मुकुंद खाडे महेश चिपळूणकर हितेश पाटील राजेंद्र मोकल यांचा संघात समावेश होता रायगड क्रीडा असोशियन चे अध्यक्ष साईनाथ पवार ,शैलेश सोनकर , पाटील मोबीन देशमुख अनिल जाधव इत्यादी राज्यस्तरीय स्पर्धेत उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला
प्रथम क्रमांक पटकावलेल्या सर्व दिव्यांग खेळाडूंचे संपुर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे .