गडब/सुरेश म्हात्रे
धरमतर वडखळ हद्दीत खुलेआम रेती उत्खनन होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.गेल्या आठवड्यात या रेती उत्खनना विरोधात प्रशासनाने कारवाई करूनही आज मोठ्या प्रमाणात धरमतर खाडीत उत्खनन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
उच्च न्यायालयाने रेती उत्खननावर कायदेशीर बंदी आणली असतानाही वरील आदेश धाब्यावर बसवून खुलेआम रेती उत्खनन होत आहे.हा खेळ रात्री चालत असून या खेळात महसूल खाते आणि पोलिस यांचा सहभाग असल्याचे जाणवते.
धरमतर खाडीत बेकायदेशीर सक्षण पंपाच्या माध्यमातून रेती उपसा केल्याची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी कारवाई केली.मात्र थोड्याच दिवसात हा खेळ पुन्हा सुरू झाला.मुद्देमाल सापडतो मात्र आरोपी सापडत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. जप्त केलेली बोट महसूल खात्याच्या नाकावर टिच्चून रेती माफियाने सदर बोट पळून नेल्याची शंका व्यक्त केली जात आहे.सदर बोट सोडून देण्यासाठी पैशाचा वापर तर झालं नाई ना?अशी शंका तमाम नागरिकांनी व्यक्त केली आहे.