गडब/अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यातील डोलवी येथील जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड या कंपनीने कमी भावात जुई बापूजी डोलवी आणि आता खारमाचे ला हद्दीतील जमिनीचे व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे . काही लोकांनी योग्य भाव देत नसल्याने जमिनी कंपनीला विकण्याचे कटाक्षाने टाळले आहे . त्यामुळे कंपनीची कोंडी झाली आहे जुई बापूजी तालुका अलिबाग हद्दीत सुरेश म्हात्रे यांची जमीन आहे सदर जमीन खरेदी करण्यासाठी कंपनीने अनेक प्रयत्न केले मात्र मात्र हे कंपनीला फितूर झाले नाहीत .
काही दिवसांपूर्वी कंपनीने टू व्हीलर बंद केल्या होत्या मात्र म्हात्रे यांची जमीन कंपनी अंतर्गत असल्याने मात्रे यांची टू व्हीलर बंद केली नव्हती मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना त्रास देण्याचे हेतूने त्यांची टू व्हीलर आत मध्ये नेण्यास बंदी घालण्यात आली होती म्हात्रे चक्रावूनगेले काही करावे सुचेना शेवटी वडखळ पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दाखल केला मात्र दहा दिवस उलटून गेल्यानंतर ही कारवाई शून्य झाली मात्र आता करावे काय शेवटी जिल्हा पोलीस प्रमुख अलिबाग यांच्याकडे अर्ज केला होता त्यांनी सांगीतल्या प्रमाणे म्हात्रे यांच्या कुटूंबाला शेती पर्यंत नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली या कामी सीक्युरिटी ऑफीसर अरुण सर यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले . व जाण्यायेण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या तर सिक्युरीटी ऑफीसर अरुण सर जातीने लक्ष देण्यास कचुराई करत नाहीत .
आता तर कंपनीचे भुसंपादन अधिकारी आत्माराम बेटकेकर आणि कुमार थत्ते यांनी सदर जमिनीची नुकसान भरपाई देता येणार नाही असे जाहिर केले आहे . मात्र म्हात्रे हे नुकसान भरपाईसाठी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न करित आहेत . कंपनी प्रशासन संबंधीत शेतीचे मालक सुरेश म्हात्रे यांना नुकसान भरपाई साठी विविध अडचणी निर्माण करीत आहेत मात्र म्हात्रे हे कंपनीपुढे नमते घ्यायला तयार नाहीत म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कंपनीला विविध मार्गाने कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करित आहेत . कंपनी प्रशासन कीतीही प्रयत्न करित असले तरी सदर कंपनीला जमिन कदापी विकणार नाहीत असा पवित्रा म्हात्रे आणि त्यांच्या कुटूंबीयांनी घेतला आहे .

