Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

ग्रामीण भागातील माता-भगिनींच्या आरोग्य तपासणीचे काम कौतुकास्पद : खा. सुनील तटकरे*

Responsive Ad Here




*गडब / अवंतिका म्हात्रे*


रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनने तालुक्यातील ग्रामीण भागातील माता-भगिनींसाठी वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्याचे कौतुकास्पद काम केले असल्याचे प्रतिपादन रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी केले.

    रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनच्या वतीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत वैद्यकीय मार्गदर्शन, आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे उद्घाटनाप्रसंगी खा. तटकरे बोलत होते. या शिबिरात नवी मुंबई येथील प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. सलील पाटकर, अलिबाग येथील स्त्री-रोगतज्ञ डॉ. राजश्री चांदोरकर, रोहा येथील येथील स्त्री-रोगतज्ञ डॉ. पूजा भट, नागोठण्यातील स्त्री-रोगतज्ञ डॉ. अभिजीत कोकणे यांनी महिलांना मार्गदर्शन करण्याबरोबरच बहुसंख्येने उपस्थित असलेल्या गर्भवती व इतर महिला, आशासेविकांची आरोग्य तपासणी केली.

     यावेळी राष्ट्रवादीचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक, सचिव डॉ. संकेत म्हात्रे, खजिनदार डॉ. चिन्मय ओक, रोहा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाणे, नागोठणे प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती मंचीकटला, डॉ. जी. एस. कोकणे, डॉ. रोहिदास शेळके, डॉ. सुनील पाटील, विलास चौलकर, बाळासाहेब टके, डॉ. अन्वर हाफिज, डॉ. पुरुषोत्तम भोईर, डॉ. नरेश सोप्टे, डॉ. अभिषेक शहासने, डॉ. अजहर दफेदार, डॉ. नचिकेत पाटील, डॉ. आरिफ खान, डॉ. मंदार माने, डॉ. निखील गरुडे, बिपिन सोष्टे, डॉ. गीता पाटील, डॉ. प्रतिभा ससाणे, डॉ, प्राजक्ता शहासने, डॉ. विजया माने, रिचा धात्रक, सुजाता जवके, दिपाली टके, राजश्री टके, अनुराधा शहासने, सखुबाई पिंगळा, आशा शिर्के, प्रतिभा तेरडे, सुनिता तटकरे आदींसह महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.