Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

प्रिझम जॉन्सन लिमीटेड व ग्रुप ग्रा.पं काराव तर्फे शिलाई मशीन व घरघंटी वाटप .

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे 

पेण तालुक्यातील गडब ( काराव ) यांच्या तर्फे प्रिझम जॉन्सन लिमिटेड व ग्रुप ग्रामपंचायत काराव यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमणे जागतिक महिला दिना निमित्त जॉन्स कंपनीत नुकताच महिलांचा सन्मान म्हणून शिलाई मशिन व दिव्यांगाना घरघंटी वाटपाचे कार्यक्रम संपन्न झाला .
          सदर कार्यक्रमात प्रिझम जॉन्सन लिमिटेड कंपनीचे अरविंद जोशी, ग्रुप ग्रा.पं च्या सरपंच मानसी मंगेश पाटील , उपसरपंच मनोज काशिनाथ म्हात्रे, व ग्राम पंचायत सदस्य व सदस्या यांच्या हस्ते गरजु महिलांना शिलाई मशीन व दिव्यांगांना घरघंटी वा साचे कार्यक्रम सेपन्न झाले . यावेळी ग्रापं सदस्य मनोहर पाटील, गीता पाटील, दिनेश म्हात्रे, दिपक कोठेकर, जगदीश कोठेकर, किर्ती म्हात्रे, संध्या म्हात्रे, वैशाली म्हात्रे, मुक्ता वाघमारे, दिपाली भोईर या सर्व सदस्यांनी घरघंटी व शिलाई मशिन वाटपात मोलाचे सहकार्य केले . शेवटी जॉन्सन प्रिझम लि . कंपनीचे व्यवस्थापक अरविंद जोशी यांनी सर्वाचे आभार मानले व सुत्रसंचालन मोरेश्वर कडू यांनी केले .