कोकणचा तिठा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या वडखळ येथिल जे . एस .डब्ल्यू स्टील लि . डोलवी, एच आर जॉन्सन गडब कंपन्या आहेत सदर कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी गीळकृत्त करत पाण्यावरही आडवा हात मारला आहे . त्यामुळे मच्छिमार आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे . घोंगावणाऱ्या यंत्रामधून उडणारा लोखंडी कीस आणि चुन्याची भुकटी हवेमध्ये मिसळत असल्याने डोलवी, कारावी, गडब, खारपाले, कासू आणि वडखळ विभागातील नागरीकांना विविध आजार होऊ लागले आहेत .
पेण तालुक्यातील डोलवी येथे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जे .एस .डब्ल्यू कंपनीने गडब, डोलवी, खारकारावी, नवेगाव वावे ,वडखळ बेनेघाट शिंगणवट ,बोर्वे व जुईबापुजी या परिसरातील शेतकऱ्यांवर विविध आश्वासनांची खैरात करत एक एकर जमिनी मागे 52 लाख रुपये तसेच स्थानिक भुमीपुत्रांना नोकरी देतो असे आश्वासन देण्यात आले होते मात्र कालांतराने एक एकरला नोकरी हा मुद्दा कालबाह्य झाला . त्यामुळे आपल्या परिसरात कारखाना येत आहे व आपल्या बेरोजगारांना काम मिळेल या आनंदात येथिल शेतकरी होते .
परंतु प्रकल्प पुर्ण झाल्या नंतर कंपनीने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाणे पुसली .
जुईबापुजी येयिल बाहेरकाठ्याची दुरुस्ती शेतकऱ्याच्या इतिहास पुर्व जाण्या - येण्याचे मार्ग . मोकळे करून देणे, अंतरबाह्य सर्वे करून बांध पुर्ववत करणे . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई - देणे, गावात प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेणे . त्यवेळी तात्कालीन कांग्रेस जिल्हा अध्यक्ष रवीशेठ पाटील तात्कालीन आरोग्य सभापती सुरेशशेठ म्हात्रे, डोलवीचे सरपंच व गडबचे सरपंच यांनी तोडगा काढण्याचे ठरवीले होते . मात्र व्यवस्थापन वेळकाढूपणाचे धोरण आवलंबत आहे व शेतकऱ्यांची दिशाभूल करू पाहत आहे . कंपनीने शेतक ऱ्यांना प्रकल्पग्रस्त असल्याचे सर्टीफीकेट दिलेले आहे . परंतु कंपनीतर्फे प्रशिक्षण देऊन योग्यतेनुसार कंपनीत नोकरी दिली जाईल असेही आश्वासन देण्यात आले होते .परंतु आजपर्यंत कोणालाही प्रशिक्षण अथवा नोकरी समाविष्ट केलेले नाही कंपनीमधून आज मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे मोठ-मोठे आवाज निर्माण केले जात आहेत येथील खारमाचेला ( गडब )येथील शेती निकृष्ट निर्माण केल्या आहेत शेतकऱ्यांचे जाणे येण्याचे मार्ग बंद केले आहे तसेच खारेपाणी शेतीमध्ये घुसून शेती नापी बनवली आहे कंपनीच्या बार्जेस मालवाहू जहाजांच्या वरदळीने या परिसरातील खाडी व समुद्र लगतच्या भागात जणू थैमान घातल्यासारखे झाले आहे मच्छीमारांचे जाडी तोडणे मांडे मोडणे होड्यांना धडक देणेअसे प्रकार होत असतात त्या तीन मच्छीमारांच्या मृत्यूचीही नोंद आहे बार्जेस्टच्या येण्या-जाण्यामुळे प्रचंड लाटा उठतात किनारपट्टीवर जोरदार आढळल्याने शेतीच्या बाहेर काट्याची धूप होऊन खांडी जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत प्रदूषित दूध लोखंडी की चुन्याची भुकटी धुळीचे कण हवेत पसरल्याने हा परिसर लालेलाल झालेला दिसत आहे प्रदूषणामुळे येथील लोकांना विविध आजारांची लागण लागली आहे उदाहरणार्थ खोकला दमा सारखे आजार संभवत या कंपनीत नोकरी करायची म्हणजे नऊ ते दहा वर्षे आयुष्यातून कपात करणे यासारखे आहे लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे कंपनीच्या विरोधात अनेकदा मोठे उपोषण करण्यात आली त्यावेळी मध्यस्थीसाठी राजकीय तसेच सामाजिक नेते पुढे सरसावले व त्यांनी आपली पोळी भाजून घेतली असे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कंपनीत स्थानिकांना डावलून बिहार युपी मध्य प्रदेश या राज्यातून आलेल्या कामगारांना प्राधान्य दिले जात आहे .कंपनीच्या चालकालपणामुळे प्रकल्पग्रस्तांची परवड सुरू आहे .
सुरेश म्हात्रे - गडब - पेण - रायगड