गडब / सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील खारभूमी विकास खात्याच्या कारभाराबाबत सातत्याने आरडाओरड सुरु आहेत. त्यातच आमटेम खारभूमीच्या कामाचे टेंडर अद्याप निघालेले नसताना देखील एका ठेकेदाराने काम सुरु केल्याने आमटेमची खारभूमी ठेकेदारांना आंदण दिली आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
आमटेम ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रमध्ये ओवळी गावची उघाड अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेपणामुळे पुर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. वारंवार ग्रामस्थनी पाठपुरावा करून देखील या उपाडीचे वाम झाले नाही. मात्र, त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कामाला काणाची गंजुरी मिळाली गात्र, काणाचे आतपर्यंत टेंडर प्रोरोरा झालेली नाही. याच पंचक्रोशीतील एका ठेकेदाराने टेंडर प्रोसेस होण्याच्या अगोदरन काम मला मिळाले असे सांगून, काही सामान ओवळी येथील उघाडीवर उतरवले व कामाला आपल्याच घरची प्रॉपर्टी असल्याप्रमाणे कामाला सुरूवात देखील केली. परंतु, ही बाब जेव्हा ग्रामस्थांच्यासमोर आली त्या वेळेला गावकऱ्यांनी सदर कामाला विरोध दर्शविला, परंतु ठेकेदाराने कुणाचेही ऐकले नाही. त्यावेळी मात्र, ओवळी ग्रामस्थांनी अधिकारी वर्गाकडे धाव घेतली. अधिकाऱ्यांकडून थातूर-मातूर उत्तर दिल्याने ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना गाठले तेव्हा प्रस्तुत प्रतिनिधीने खारभूमीचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांची भेट घेऊन खरी परिस्थिती जाणून घेतली तेव्हा समजले की, ओवळी येथील उघाडीचे काम कोणत्याही ठेकेदाराला दिले नाही. कारण त्याची टेंडर प्रोसेस सुरू असून योग्य त्या सुबेला देण्यात येणार आहे. उघाडीचे काम मोकल नामक व्यक्ती करत असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. त्याप्रमाणे मी आमच्या अभियंताना सुचना देउन ते काम तातडीने बंद करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे कुणी काम केल्यास आम्ही त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई देखील करू निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्याच्या वाटयाला काम येईल त्यांनी ते काम कराव असे शेवटी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना कार्यकारी अभियंत्यानी सांगितले. जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात खारबंदिस्तीची कामे ही अनेक ठेकेदार स्वतःच्या तिर्थरूपाची प्रॉपट्री असल्याप्रमाणे कामे मंजुर होण्याअगोदर आपल्याला काम मिळाले आहे असा बोंबाटा घालतात कित्येक वेळा काम न करताना देखील अधिकारी वर्गांना लक्ष्मीदर्शन घडवून बिल काढतात. हा प्रकार पेण तालुक्यात नव्हे तर पुर्ण जिल्हयात ज्या ज्या ठिकाणी खारबंदिस्ती आहे तेथे होत असतात. ओवळी येथील उघाडीचे काम साधारणतः ९ ते १० लाखाचे काम आहे. मात्र, त्यांची निविदा निघण्या अगोदरच सदर काम आपल्याला मिळालेल्या असल्याचे ठेकेदारांनी घमजाव केला आहे