गडब/सुरेश म्हात्रे
मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक
वेषांतर करुन आत्मदहनाचा
प्रयत्न
आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर दोन दिवस अज्ञात स्थळी गेलेल्या जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील पोलिसांना चकमा देत वेषांतर करुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हजर झाले. कोणाला काही कळण्याच्या आत त्यांनी सोबत आणलेले रॉकेल
अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तसेच मिनिडोअर चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आणि विजयभाऊ यांच्या पत्नी यांनी त्यांच्याबाजूने कडे करीत त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखून धरले.
शासनाच्या धोरणाविरोधात आक्रमक झालेल्या मिनिडोअर पालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांसह संघटनेचे पदाधिकारी आणि नातेवाईकांनी झटापट करून त्यांना रोखून धरल्याने पुढील अनर्थ टकला. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैना यांनी विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला शासनाकडून १७ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे पत्र दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मिनिडोअर चालक मालकांनी वाहतूक बंद ठेवल्याने प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली. दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यात खोळंबा झाला होता.