गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील गडब गावात ग्रामीण विभागात गुटखा विक्री जोरात असून गडब सारख्या गावात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे .
याबाबत मिळालेले वृत्त असे की, टपरीधारक व किराणा मालाच्या दुकानात गुटखा विक्री होत असते . याबाबत अन्न व औषध प्रशासनाला व पोलिसांना माहिती असूनही कारवाई होत नाही . सदर गुटख्याच्या आहारी जाऊन तरुण पीढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे . एक परप्रांतीय गुटखा विक्रेता गडब गावात गुटख्याची गुरख्याची पाकीटे पोहोच करित असतो सदर गुरखा विक्रिता साहेबांच्या नावाने पैसे गोळा करत असतो सदर गुटखा विक्रेता नाव न छापण्याच्या अटीवर साहेबांना चिरी - मिरी देत असतो .
या सर्व प्रकारात चोरी छूपे गुरखा विक्री तेजित केली जाते . जिवीतास घातक असणाऱ्या गुरखा विक्रीला संपुर्ण चाप लावावा अशी मागणी गडब वासीय जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्या कडे केली आहे .