गडब/सुरेश म्हात्रे
१ व २ मार्च रोजी कोटा राजस्थान येथे दिव्यांग महाराष्ट्र, राज्यस्थान व उत्तर प्रदेश यांच्यात होणाऱ्या दिव्यांग टी-२० स्पर्धेसाठी ऑल स्पोर्टस असोसिएशन फॉर डिसेबल्ड अँड रेहाबिलिटिएशन, महाराष्ट्र व सहकार्य (अपंग) दिव्यांग कल्याणकारी संस्था रायगड यांच्या सहयोगातून महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघ सहभागी होणार आहे.
या संघात रायगड जिल्ह्यातील रमेश संकपाल कर्जत, अभिजित मुंढे, खालापूर, विवेक कदम रायगड, सुनील पाटील पनवेल, नवनाथ घोडके, खालापूर, कमलाकर कोळी, पेण, नंदुरबार जिल्ह्यातील विजय वळवी,
राजू वळवी, कालिदास वसावे, मुंबईतील रुपेश पवार, उस्मानाबाद जिल्ह्यातील भास्कर राठोड, लातूर जिल्ह्यातील हरनामसिंग टाक या खेळाडूंसह कर्णधार कल्पेश तवले व प्रशिक्षक शशांक हिरवे, संघ व्यवस्थापक म्हणून
ऑल स्पोट्र्स असोसिएशन फॉर डिसेबल्ड अँड रेहाबिलिटिएशन, महाराष्ट्र अध्यक्ष व सहकार्य (अपंग) दिव्यांग कल्याणकारी संस्था सचिव शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आले आहे.
*१ व २ मार्चला टी- २० स्पर्धेचे आयोजन*