गडब/सुरेश म्हात्रे
पेण येथे पेण नगरपालिकेच्या सभागृहामध्ये खा. सुनिल तटकरे यांनी पेण शहर व पेण ग्रामीण भागातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी आ. अनिकेत तटकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, मुख्याधिकारी पेण नगरपालिका जीवन पाटील, यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा,
जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, विद्युत महावितरण अदी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांकडे असलेली माहिती यामध्ये मोठया प्रमाणात तफावत असल्याने सभागृहात काही वेळ गोंधळल्याचे वातावरण निर्माण झाले आणि अधिकारी चुकीचे बोलत आहेत असा अक्षेप खुद्ददस्तुर खा तटकरे यांनी घेतला. यावेळी खारबंदिस्तीवर
या बैठकीमध्ये हेटवणे शहापाडा योजनेबाबत अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि सर्व सामान्य व आगामी काळात येणाऱ्या जास्तीच्या उधाणावर चर्चा होउन खारबंदिस्ती कशाप्रकारे वाचवता येईल यावर चर्चा करण्यात आली व उधानाच्या अगोदर खबरदारीचे उपाय घेण्याचे आदेश देखील यावेळी खासदारांकडून देण्यात आले...
पेण शहरातील पंतप्रधान आवास योजना, शहरातील पाणी पुरवठा, महिला बचत गट, शहरातील रस्ते यांच्यावर सादक भादक चर्चा करून १३ मार्च पर्यंत सर्व योजनांची माहिती देण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देऊन या आढावा बैठकीची सांगता करण्यात आले.