Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

रायगडात पुन्हा पाणीटंचाईचे संकट

Responsive Ad Here
♦️प्रशासनाची तयारी सुरू♦️

 ♦️७ कोटी ६१ आराखडा लाखांचा संभाव्य♦️
 
♦️१ हजार ३२८ गावे, वाड्यांचा समावेश♦️

 ✒️गडब/सुरेश म्हात्रे✒️

रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी ७ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करुन मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात 
आलाआहे. या आराखड्यात १ हजार ३२८ गावे व वाड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
     या आराखड्यात विहिरी खोल करणे त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

    जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य खोतव्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध वीतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी खोत दूषित होणार नाहीत पाची सर्वांनी काळजी घ्यावी. कुठे पाणी पुरवठा पाइपलाइन फुटती असल्यास निदर्शनास आणून द्यावी.
       -डॉ.किरण पाटील कार्यकारी   अधिकारी जि.प