Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पनवेल तालुक्यातील नेरे गावात चोरांचा धुमाकुळ ; चोरांना पकडण्याची मागणी

Responsive Ad Here
गडब/अवंतिका म्हात्रे

   पनवेल तालुक्यातील नेरे गावात चोरांनी धुमाकुळ घातला आहे .गेला तीन रात्री चोरांनी तब्बल तीन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे .परिसरात हे चोरटे दुकानांचे कडी कोयंडे तोडून मौल्यवान दस्तऐवज आणि रोकड घेऊन पसार होत आहेत .या घटनेनंतर चोरट्यांनी आपले लक्ष मंदिराकडे वळवले आहे .गावातील गजानन महाराज मंदिरात या शषस्त्र चोरांनी मोठा हात मारला आहे चोरट्यांनी दान पेटीतून हजारो रुपये पळवीले असल्याचे समजते .चोरांनी देवाला देखील सोडले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत . मंदीरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे सारे कैद झाले आहे . चोरट्यांकडे काही शस्त्र असल्याचे ही दिसत आहे . काळ्या कपड्यात असलेले चोरटे आपण ओळखले जाऊ नये म्हणून डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क लाऊनl hii होते . मंदिरात शिरताच त्यांनी दान पेटीकडे आपला मोर्चा वळवीला . हे चोरटे हत्यारांनी दानपेटी फोडत असल्याचे दिसत आहे . त्यामुळे नेरे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .
       या संदर्भात नेरे गावातील दिनेश मांडवकर ( पनवेल तालुका सचिव ) विश्वास पाटील पनवेल तालुका उपाध्यक्ष आणि विद्याधर चोरघे (मनसे नेरे विभाग अध्यक्ष) यांनी पनवेल तालुका वरिवठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर चोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे .