गडब / सुरेश म्हात्रे
पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या नावाने वर्षाला ६ हजार रुपये बँक खात्यात यशवंत बाळाराम म्हात्रे रा . मुंडाणी ता . पेण यांच्या नावे जमा करण्यासाठी जिल्हा अधिकारी रायगड व पेण तहसिलदारांना निवेदन सादर केले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , श्री यशवंत म्हात्रे यांनी १४ / ११ / २० २२ रोजी अर्ज करून उपजिल्हा अधिकारी रायगड यांना सखोल चौकशी करून बँक खाता क्र .५१४७०१००००१४३३ चुकीचा असल्याने काशी गणपत लेंडी यांच्या खात्यात ४ हात्ते रक्कम ८ हजार रु बँक ऑफ बडोदा शिहू येथे जमा झाले आहेत सदर लाभार्थ्यांची भौतीक तपासणी केली असता खाते क्र चुकीचे आढळून आले तरीही यशवंत म्हात्रे यांचा खाते क्र ५१४ ७० १०००० १४ ३३ दुरुस्त केला आहे अशी दि . २८ .११.२० २२ मा स्वप्नाली डोईफोडे तहसिलदार पेण यांनी श्री म्हात्रे यांना व मा . जिल्हा अधिकारी रायगड अलिबाग यांना उत्तर दिले आहे . मात्र म्हात्रे यांच्या नावाचे ८ हप्ते पेण तहसिलदार कार्यालयातच शिल्लक त्या संबंधी संबंधीत अधिकाऱ्याचे नाव देणे दि .२५/११/२०२२ रोजी निवासी उपजिल्हा अधिकारी यांच्या दुरध्वनीवर चर्चेत पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी म्हात्रे यांच्या २० दिवसात रक्कम जमा करण्यात येईल असे सांगीतले होते मात्र पी एम किसान निधी दि . ६ / ३ / २०१९ ते २० २२ पर्यंत ४ वर्षाचे १२ हप्ते कॉम्प्युटरला नोंद असून सुद्धा आजपर्यंत एकही हत्ता जमा झालेला नाही . त्या अनुशंघाने यशवंत म्हात्रे यांनी दि .१७/०१/२३ रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याचे कळविले आहे या संदर्भात मा पो अधिक्षक अलिबाग, पो. नि . अलिबाग, तहसिलदार पेण, मा . उपविभागीय अधिकारी पेण यांना निवेदनाद्वारे कळविले आहे .
