Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

**************** ⭕ *पेणः अवैध उत्खनन ?*⭕ 🔵गडब परिसरात डोंगरावर प्रकार 🔵 🔵महसूल यंत्रणेचे कारवाईकडे दुर्लक्ष 🔵

Responsive Ad Here



*गडब/सुरेश म्हात्रे*


पेण तालुक्यातील गडब ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये महामार्गाला लागून असलेल्या डोंगरावर मोठया प्रमाणात उत्खनन सुरु आहे. मात्र, त्या उत्खननाबाबत महसूल विभाग अनभिज्ञ असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला आहे.

ज्या डोंगरावर उत्खनन चालू आहे तिथे चार पोकलेन, दोन हायड्रा, दोन ब्रेकर, तीन डंपर अशा यंत्र सामुग्रीने उत्खनन दोन महिने सुरु आहे. परंतु ज्यावेळेला प्रसार माध्यमांनी या उत्खननाकडे लक्ष केंद्रीत केले त्यावेळेला तलाठी पार्वती वाघ यांनी पंचनामा केल्याचे भ्रमंतीध्वनीवरून वार्ताहरांशी बोलताना कबूल केले.

गेली दोन महिने पूर्ण डोंगरावर माती व दगडांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असून यामध्ये महसूल खात्याचे लाखोंचे नुकसान झालेले आहे. त्यावर एकूण वेगवेगळ्या सर्व्हे नंबरमध्ये उत्खनन सुरु असल्याचे तलाठी वाघ यांनी सांगितले.

काराव येथे होत असणाऱ्या उत्खननाबाबत महसूल विभागाचे वरिष्ठ लिपीक पंडीत राठोड यांना भ्रमंती ध्वनीवरुन विचारणा केली असता त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्याबाबत मला तोंडी कळविले आहे. परंतु आत्तापर्यंत टपालात लेखी स्वरुपात पंचनाम्याची प्रत उपलब्ध झालेली नसल्याटी माहिती दिली. डोंगरावर झालेल्या वृक्ष कत्तलीबाबत वडखळ वनक्षेत्रपाल अधिकारी संस्कृती पाटील यांना प्रत्येक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी कार्यालयाकडे रविंद्र वाडपाले यांनी १२२ झाडे तोडण्याची परवानगी मागितली. आम्ही १२२ झाडे तोडायला परवानगी दिलेली आहे. मात्र, १२२ पेक्षा जास्त झाडे तोडल्यास आम्ही त्यावर दंडात्मक कारवाई करु. असा इशारा दिला आहे. परंतु १२२ पेक्षा जास्त झाडे तोडल्याचे निदर्शनास येत आहे मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही .

     यासंदर्भात गडब येथील पत्रकार सुरेश म्हात्रे यांनी जिल्हा अधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, सदर उत्खनन करणाऱ्यां विरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे .

*******************