गडब / सुरेश म्हात्रे .
पेण तालुक्यातील गडब गावातील जनता हायस्कुल गडब ता पेण या शाळेत शिकणाऱ्या
विद्यार्थ्यांचा थोडक्यात "संकल्प ९१ " या संघटनेचा स्नेह मेळावा आई एकविरा कार्ला येथे आयोजीत केला आहे .
सदर मेळाव्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी गडब ता . पेण येथे जमणार आहेत . सदर मेळाव्याची तारिख ८ जानेवारी अशी ठेवण्यात आली आहे . सदर मेळाव्याच्या दिवशी माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी गडब येथून सकाळी एकविरा दर्शनाला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे .
मेळाव्याची तयारी सुधीर पाटील, सुरेश म्हात्रे मंगेश पाटील, अनिलशेठ म्हात्रे वसंत साळुंखे संजय म्हात्रे, वसंत म्हात्रे, महेश पाटील नितीन पाटील विश्वास पाटील संतोष पाटील संजय शिवकर आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे . यावेळी विविध गुणदर्शक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत

