Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️ *गडब (काराव)च्या उपसरपंच पदी मनोज काशिनाथ म्हात्रे यांची बिनविरोध निवड*♦️

Responsive Ad Here





गडब/सुरेश म्हात्रे 


पेण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकताच संपन्न झाल्या,काही उमेदवार बिनविरोध निवडून आले तर काही जण चुरशीच्या लढतीत थोडक्यात पराभूत ही झाले.सदर निवडणुका थेट असल्यामुळे सरपंच पडला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले होते.

  आज दिनांक २ / १ / २०२३ रोजी उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत गडब (काराव) येथे संपन्न झाली.सदर निवडणुकीत मनोज म्हात्रे,यांच्या विरुद्ध एकही अर्ज न प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रसाद म्हात्रे यांनी मनोज म्हात्रे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले .या वेळी फटाक्यांची आतिषबाजी कार्यात आली.म्हात्रे यांचे संपूर्ण कुटुंबच यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते,या वेळी शेकापचे प्रसाद भोईर यांनी म्हात्रे यांना तस्वीर भेट म्हणून दिली.यावेळी माजी उपसरपंच नितीन पाटील यांच्यासह निवेदीत सदस्य उपस्थित होते.

    यावेळी सरपंच सौ.मानसी पाटील यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन कार्य करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.तर उपसरपंच मनोज म्हात्रे यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी कऱ्यतत्पर असल्याचे सांगितले.