Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करायचे आहे !

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

 सरकार, शासनाचे धोरण जनतेच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाहीत. गेल्या अनेक वर्षात जो विकास झाला आहे, तो जनतेच्या सहभागातून झाला आहे. गेल्या १३ वर्षात राष्ट्रीय मतदार दिनाच्यानिमित्ताने खुप काही साध्य केले आहे. रायगड ही सरखेल कान्होजी आंग्रेची भूमी आहे, या जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी आपण सर्वांनी झोकून देऊन काम करायचे आहे. शासन, सरकार म्हणून सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन रायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळ, जेएसएम कॉलेज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (ता. २५) १३ वा राष्ट्रीय मतदार दिन अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव,
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हशे 
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, जेएसएम कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अनिल पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, अलिबागचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष साईनाथ पवार, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, रोहाच्या तहसीलदार कविता जाधव आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या
विभागातील अधिकारी, कर्मचारी, जेएसएम महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे म्हणाले, सरकार, शासनाचे धोरण जनतेच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाहीत. गेल्या अनेक वर्षात जो विकास झाला आहे, तो जनतेच्या सहभागातून झाला आहे. गेल्या १३ वर्षात राष्ट्रीय मतदार दिनाच्यानिमित्ताने र खुप 
काही  
*अनेकांचा झाला सन्मान*

_रायगड जिल्ह्यामध्ये मतदार जनजागृती करण्यामध्ये वेगवेगळ्या शासकिय यंत्रणेसह वेगवेगळी सामाजिक, व अन्य संस्था, पत्रकारांचा सहभाग लागला आहे._ _राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पनवेल येथील लोक परिषद, पिल्लई कॉलेज, सीकेटी कॉलेज, अलिबागमधील जेएसएम कॉलेज, निवडणूक सारक्षता मंडळ, प्रिझम सामाजिक संस्थाच्या तपस्वी गोंधळी,_ _श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, रोह्याचे तहसीलदार कविता जाधव, खालापूरचे तहसीलदार दशरथ भोईर, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र दुसार जिल्ह्यातील सर्व बीएलओ, डाटा ऑपरेटर आदींचा सन्मान_ करण्यात _आला._ साध्य केले आहे. रायगड ही सरखेल कान्होजी आंग्रेची भुमी आहे, या जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी आपण सर्वांनी झोकून देऊन काम करायचे आहे. शासन, सरकार म्हणून सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे, असे म्हसे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी सांगितले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. वेगवेगळे शिबीर घेऊन कायद्याची माहिती सर्व घटकांपर्यंत
पोहचविण्याचे काम केले आहे. अलिबागमधील लॉ कॉलेजचा यामध्ये चांगला सहभाग राहिला आहे. भविष्यात लॉ कॉलेजच्यावतीने अनेक कार्यक्रम घ्यायचे आहे. जिल्हा प्रशासन, लॉ कॉलेज आपल्या एकमेकांच्या सहयोगातून कार्यक्रम घेऊन तरुणाईपर्यंत जनजागृती निर्माण केली जाणार आहे, असे अमोल शिंदे म्हणाले.