गडब/सुरेश म्हात्रे
गेल्या ७५ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानासह मूलभूत सुविधांपासून वंचित राहीलेल्या पेण तालुक्यातील पाच आदिवासी वाड्यांतील सुमारे तीनशे आदिवासी बांधवांना मतदार नोंदणीसह इतर सुविधां उपलब्ध करुन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याने, प्रजा- सत्ताक दिनी नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या आंदोलनाने आता या सर्व आदिवासी बांधवांना न्याय मिळणार असून या सर्व आदिवासी बांधवांच्या आयूष्यात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवणार आहे. ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने केलेल्या आंदोलनाच्या झटक्याने शासनाला आता जाग आली असून मतदार नोंदणी करण्यासह जल जीवन मिशन योजने मधील पाणीपुरवठा योजनेस प्रारंभ करण्यात असल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून आदिवासींच्या हस्ते ध्वजवंदन करणार असल्याचा इशारा गेल्या १३ जानेवारी रोजी पेण पंचायत समितीवर हजारो आदिवासींनी काढलेल्या मोर्चा दरम्यान दिला होता. याची तातडिने दखल घेत प्रशासनाकडून तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली असल्याने २६ जानेवारीचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावरील धडक मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील तांबडी, काजूची वाडी, खऊसावाडी, केळीचीवाडी आणि उंबरमाळ या पाच आदिवासी वाडयांतील
*तांबडी आदिवासी वाडी येथे आदिवासी बांधवांची मतदार नोंदणी करून त्यांना तातडिने दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्डचे वितरीत करताना पेणचे नायब तहसीलदार दादासाहेब सोनवण*
आदिवासी बांधवांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या ७५ वर्षात एकदाही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केलेले नाही. त्यांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा संविधानिक हक्कही बजावता आलेला नाही. त्यामुळे त्यांचा विकास खुंटला असून या आदिवासी बांधवांना रस्ता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध यांच्या नेतृत्वाखाली १३ जानेवारी जी पेण पंचायत समिती कार्यालयावर पाचही
आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी निषेध मोर्चा आणून आम्ही आदिवासी भारताचे नागरिक नाहीत का ? असा सवाल प्रशासनाला विचारला होता.२६ जानेवारी २०२३ पर्यंत मतदार नोंदणी व इतर पाच मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रजासत्ताक दिनी मोर्चानि धडकणार असल्याचा इशारा ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता. या आंदोलनाची
तत्काळ झाली मतदार नोंदणी
उंबरमाळ, तांबडी, कसा वाडी, काजूची वाडी, केळीची वाडी या पाचही वाड्यांमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामास प्रारंभ झाला तर पेण तहसीलच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबवून बुधवारी तांबडी येथे आदिवासी बांधवांची मतदार नोंदणी करून घेत त्यांना दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्डचे वितरीत केले.
दखल घेत उंबरमाळ, तांबडी, कसा वाडी, काजूची वाडी, केळीची वाडी या पाचही वाड्यांमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला आहे. तर पेण तहसील कार्यालयाच्या वतीने दोन दिवसीय मतदार नोंदणी अभियान या पाचही वाड्यांसाठी राबवून बुधवारी तांबडी येथे आदिवासी बांधवांची मतदार नोंदणी करून घेत त्यांना दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डचे वितरीत करण्यात आले.
यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दादासाहेब सोनवणे, बी.एल. डी. हेमलता तायडे, मंडळ अधिकारी सुरेंद्र एम. ठाकुर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजू पाटील, सचिन पाटील, निवडणूक कारकुन पंडित राठोड, पुरवठा अहवाल कारकून यतीराज गरुड, अस्मिता गावंड, नीलम म्हात्रे आदि उपस्थित होते. दरम्यान प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत असल्यान २६ जानेव- जारी रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणारा धडक मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याचे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी प्रशासनास कळविले आहे..