गडब/सुरेश म्हात्रे
एका महिलेचे विवाहित पुरूषावर प्रेम जडले आणि त्यानंतर त्याला मिळविण्यासाठी तिने अशी काही तडजोड केली की ऐकणारेही थक्क होऊन गेले. अगदी एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल, असा हा प्रसंग घडला आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात. तिचे वय 54 वर्षाचे आहे. गेली आठ वर्षापासून तिचे एका विवाहित पुरूषावर प्रेम जडले. त्यांचा हा प्रेमाचा सिलसिला आठ वर्षापासून सुरू होता. हे दोघेही एकाच ऑफीसात काम करत होते. त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर मग प्रेयसीने हट्ट धरला की आता तिला त्याच्यासोबतच कायमचे राहयचे आहे. त्याची मोठी पंचाईत झाली. तिला आपल्या घरी कसे न्यायचे, असा प्रश्नही पडला. त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत तो राहत असताना आता तिला कसे घरी न्यायचे, याची चिंता त्याला पडलेली असतानाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण त्याच्या पत्नी आणि दोन मुलींना लागली आणि मग यावरून सतत भांडणे होऊ लागली. दोन मुली आणि पत्नीने त्याला समजावून सांगितले, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर दोन मुलींनी पुढाकार घेतला आणि हे प्रकरण थेट कौटुंबिक न्यायालयात पोहोचले.
पत्नी आणि त्याची प्रीयसी यांचे कौन्सलिंगही करण्यात आले. पण कोणीच ऐकण्यास तयार नव्हते. अखेर त्या प्रेयसीने चक्क पत्नीला एक आफरच दिली. ही काही थोडीथोडकी नाही तर चक्क दीड कोटी रूपयांची आॅफर होती. 27 लाख रूपये कॅश आणि एक चांगल्या वस्तीतील डुप्लेक्स बंगला द्यायचा आणि त्या बदल्यात पत्नीने आपल्या पतीला तिच्या हवाली करायचे. पत्नीही मग श्रीदेवीच्या जुदाई चित्रपटातील नायिकेप्रमाणे वागली. आपला पती तिने दीड कोटी रूपयांना थेट विकून टाकला आणि पतीला कायमचे बाय बाय केले. वीस वर्षापासूनचे त्यांचे वैवाहिक नातेसंबंध आता कायदेशीरपणे संपले असून प्रीयसीलाही कायदेशीर अधिकार मिळाला आहे.