Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

विवाहाचे बदलते स्वरूप

Responsive Ad Here
विवाहासंबंधी अनेक म्हणी प्रचलित आहेत. इतकंच काय, लग्न हा जुगार आहे म्हटले जातं. शिवाय साहित्य आणि जीवन संबंधित विविध कला फॉर्म विवाह आणि संबंधित बाबींशी तसेच विविध समस्यांनी भरलेले आपण पाहतो. तसेच अनेक चित्रपटात विवाहानंतर कथेची समाप्ती दर्शवतात. यावरून हे लक्षात येतं की, आत्मनिर्णायाने विवाहापर्यंत पोहोचण्यासाठी कितीतरी प्रकारच्या समस्या असतात. पारंपरीक विवाहात सुद्धा विवाह निश्चित होण्यापासून ते त्याच्या आयोजनापर्यंत जोडल्या गेलेल्या कितीतरी कुप्रथा, अनेक समस्या निर्माण करणाऱ्या अशाच आहेत. त्यात महिला समानतेच्या आंदोलनासंबंधी व सशक्तीकरणाच्या मुद्यावर कायद्याने घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयाने पुरुषी अहंकाराला धक्का बसलेलाच आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा एकूण परिणाम म्हणजे 'लिव-इन-रिलेशन', 'सरोगेट मदर', 'समलिंगी विवाह' अशा नवीन धारणा घट्ट होणं आहे. याचाच अर्थ विवाहसंस्था पुन्हा एकदा मोठ्या परिवर्तनाची अपेक्षा करत आहे* क विकासाच्या पहिल्या
धी काळी मानवाच्या टप्प्यात खाणं, शोधणं आणि गुहांमध्ये झोपणं हेच प्रमुख होतं. दुसऱ्या टप्प्यात सुरू झालं ते विचाराचं चक्र, त्या विचाराच्या चक्राने मानव प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळं केलं. त्यानंतर मात्र मानवाकडे इतर प्राण्यांच्या तुलनेत असणाऱ्या विवेकाने त्याला जगातील समस्त प्राण्यांत श्रेष्ठ ठरवलं. मानवाच्या विचार चक्रातून प्रथम समूह बनले, मग समाज बनला त्या अनुषंगाने नियम आणि कायदा बनला. ह्याच सातत्यपूर्ण क्रमाने पुढे निर्माण झाली ती संस्कृती. त्यातही ती सातत्याने बदलत राहिली. शिवाय त्यात ती कधी काळाच्या ओघात नष्ट झाली, तर कुठे नव्याने निर्माण झाली. मग हळूहळू त्यात उदारता, लवचिकपणा, बदलाची स्वीकार्यता आली. तरीही सर्व मानवी समाजाच्या काही गरजा या सार्वत्रिक स्वरूपाच्या राहिल्या. त्यांची पूर्तता करण्यासाठीच संस्था निर्माण झाल्या. त्यांना सामाजिकतेची जोड लाभली. त्या संस्थात कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, शिक्षणसंस्था, अर्थसंस्था व धर्मसंस्था यांचा समावेश संपूर्ण जगभर अग्रक्रमाने राहिला.
भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेत अनेक प्रकाराचे विवाह प्रचलित आहेत. मनुस्मृतिनुसार विवाह हे ब्राह्म, देव, आर्ष, प्राजापत्य, आसूर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच्या असे आठ प्रकारचे आहेत. त्यात प्रथम चार श्रेष्ठ आणि अंतिम चार क्रमशः निकृष्ट मानले जातात. विवाहाच्या लाभासंबंधी मनुस्मृतित यौनतृप्ति, वंशवृद्धी, मैत्रीलाभ, साहचर्य सुख, मानसिक परिपक्वता, दीर्घायु, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांची प्राप्ती प्रमुख सांगितली गेली आहे. तसेच विवाह- संस्काराने संपूर्ण
समाजात एक सुव्यवस्थित तंत्र निर्माण होऊ शकते, असं म्हटलं गेलं आहे. शिवाय हिंदू विवाह हा भोगलिप्सेचे साधन नाही, तर एक 
धार्मिक संस्कार आहे असंही म्हटलं आहे. संस्कारामुळे अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणात तत्त्वज्ञान व भगवत प्रेम उत्पन्न होते, ते जीवनाचे चरम तसेच परम पुरुषार्थ रूपात मानलं गेलं आहे. मनुष्यावर देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण हे तीन ऋण असतात. यज्ञ-यागादिमुळे देवऋण, स्वाध्यायाने ऋषिगण तसेच विवाह करण्याने पितरांचे श्राद्ध-तर्पण योग्य धार्मिक आणि सदाचारी पुत्र उत्पन्न करून पितृऋणाचे परिशोधन होते. अशाप्रकारे पितरांची सेवा आणि सद्धर्माचे पालन करण्याची परंपरा सुरक्षित राखण्यासाठी संतान जन्माला घालणं, विवाहाचा परम उद्देश्य आहे. ह्याच कारणाने हिंदू धर्मात विवाह एक पवित्र संस्कार मानला गेला आहे.
मात्र मानव जसजसा विकास क्रमात
प्रगत होत गेला, तसतशा त्याच्या
गरजा अमर्यादित स्वरूपाच्या झाल्या. मग त्यांची पूर्तता करण्यासाठी मानव सातत्याने पारंपरिक संकल्पनांना धुडकावून देत नवे मार्ग, नवे तंत्रज्ञान शोधण्यात प्रयत्नशील राहिला. ते करताना, तो बराच आत्मकेंद्रितसुद्धा बनत गेला.
आपल्याला काय हवं आहे आणि कितपत हवं आहे, याचा विचार करताना तो भावनेपेक्षा व्यावहारिकतेला अधिक प्राधान्य देऊ लागला. त्याचेच फलस्वरूप म्हणजे, आजच्या घडीला जगभरात मानवसृष्टीच्या विकास क्रमात तीन संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली. एक 'लिव इन रिलेशन', दोन 'सरोगेट मदर' आणि तीन 'समलिंगी विवाह'. आणि आज त्याचा प्रसार, विरोध होत असतानाही भारतातदेखील होऊ लागला. या संकल्पना भारतातील
रुढीवादी समाजाच्या धारणेला थोड्या धक्का देणाऱ्या निश्चित आहेत, तरीही त्या भारतात रुजू लागल्या आहेत. या संकल्पनांच्या सुरुवातीच्या इतिहासाचे आज आपण साक्षीदार मानले जाऊ शकतो. कारण आपल्यातल्याच काही महिला आणि पुरुष या दोघांच्या समविचाराच्या सहभागाने, या संकल्पना व्यापक पातळीवर भारतातील विवाहसंस्थेत भरपूर बदल घडवून आणू पाहत आहेत. संपूर्ण विश्वामधील पुराण संस्कृतींचे गहनतेने अध्ययन केले तर आपल्या असं लक्षात येईल की, विवाहाचे स्वरूप हे प्रत्येक ठिकाणी टप्प्याटप्प्याने वेगळे आणि बदलते राहिलेलेच दृष्टीस पडते.
वर्तमानात विवाहाच्या बदलत्या स्वरूपासंबंधी बोलायचे झाले तर, आज बरीच जोडपी स्वतःच्या सहमतीने विवाह न करता लिव- इन रिलेशनशीप मध्ये राहतात, गर्भ धारण न करता सरोगेट आई होतात वा विवाह न करता तुषार कपूर आणि करण जौहरसारखे सिंगल पॅरेंट होतात, काही समलिंगी विवाह करतात; या अशा घटना आहेत की, त्या पारंपरिक विवाहाचे बदलत चाललेले स्वरूप आपल्या पुढे आणतायेत. आज आई किंवा बाबा होण्यासाठी विवाह हा जरुरी राहिलेला नाही. तुषार कपूर आणि करण जौहरसारख्यांनी हे पाऊल उचलून समाजाचा तो भ्रम तोडला आहे, जो कुटुंब नामक संस्थेसाठी विवाहास खूप पवित्र आणि अनिवार्य मानला जात होता. हा बदल हेच सांगू इच्छितो की, निसर्गाला रुची ही केवळ त्याच्या स्वत:च्या अस्तित्वाचे रक्षण करण्यातच आहे. मानवी विवाहाशी त्याचे काही घेणे-देणे नाही. मानव काळानुसार विवाहसंस्थेत बदल करतच राहिला. कधी मातृसत्तात्मक, तर कधी पितृसत्तात्मक रुपात. मात्र निसर्ग मानवाच्या बदलत्या नैतिक मूल्यांशी आणि संस्कारांशी संबंधित न राहता, स्वतःच्या मार्गावर सतत विकासनशील होत राहिला.
मानवी समाजात विवाहसंस्था ही एक महत्त्वपूर्ण सामाजिक संस्था मानली गेली. त्यात आत्मसंरक्षण, वंशवृद्धीचे सातत्य हे प्रमुख राहिले. कारण त्याद्वारेच व्यक्ती ही समाजमान्य पद्धतीने मानवी जीवनाचे सातत्य टिकवून ठेऊ शकते, हे मानलं गेलं. जर्मनीतील समाजशास्त्राचे अभ्यासक हॉर्टन आणि हंट यांच्या म्हणण्यानुसार, विवाहसंस्था ही संतती जन्माला घालून, कुटुंबाला स्थापित करण्याची समाजाद्वारा स्वीकृत पद्धत आहे. त्यातूनच अपत्याचे पालन पोषण आणि संगोपन सुयोग्य पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे विवाहसंस्थेचे जे आवश्यक तत्व ( धारणा), संकल्पना, उद्देश, कार्यपद्धती किंवा संरचना, प्रतिके आणि सामाजिक अभिमत आणि अधिकार हे स्वीकारणे वा अंगीकारणे गरजेचे आहे, कारण त्यातूनच समाज व्यवस्था टिकून राहू शकते.

सुरेश म्हात्रे/गडब-पेण रायगड