गडब/सुरेश म्हात्रे
सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेखाली दर महिन्याला रास्तभाव दुकानातून दारिद्र्य रेषेखालील लोकांना गहू, तांदूळ साखरसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करीत आहे. कोरोनाच्या संकट प्रधानमंत्री गरीब काळात कल्याण योजनेखाली वाढीव धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचा लाभ गोरगरिबांना घेता आला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली भारत सरकार नवीन वर्षांपासून परत गरीबांना मोफत धान्य वाटप योजना कार्यान्वित करीत आहे.
रास्तभाव दुकानातून सरकार मोफत धान्य वितरण करणार असल्याची बातमी लोकांना आनंददायी ठरलेली दिसत आहे. याविषयची अधिक माहिती देताना तालुका वरिष्ठ अधिकारी संजय माने म्हणाले की, भारत सरकारने गरीबांना मोफत धान्य वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. चालू २०२३ वर्षांकरिता मोफत धान्य वाटप योजना लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनाच्या धान्यवाटपा सोबत केंद्र सरकारने देखील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत मोफत धान्य वाटप योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक व्यक्तीला एक किलो गहू, चार किलो तांदूळ दिले जाणार आहेत. अंत्योदय रेशन कोटा पूर्ववत ठेवण्यात आला आहे. लाभार्थीनी रास्तभाव दुकानातून मोफत रेशन घेताना मोफत धान्य वाटपाची पावती घ्यावयाची आहे, असे आवाहन शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातून करण्यात आले आहे.