Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️उपमुख्य मंत्री सुनेत्रा ताई पवार, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न निकाली लावणार..

Responsive Ad Here
 ✍🏻 मुंबई /प्रतिनिधी 


महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम ) मुंबईचे अध्यक्ष - सुरेश पोटे यांनी उपमुख्यमंत्री  श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांची राष्ट्रवादी कार्यालय, मुंबई येथे नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
      भेटी दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.  प्रामुख्याने रेल्वे प्रवासातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत पूर्ववत सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
    यावेळी  उपमुख्य मंत्री सुनेत्राताई पवार  यांनी सर्व मागण्या गांभीर्याने समजून घेतल्या व ज्येष्ठाच्या रेल्वे सवलतीचा प्रश्न संसदेत व संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
    या प्रसंगी फेस्कॉम मुंबई अध्यक्ष - सुरेश पोटे, उपाध्यक्षा - डॉ. रेखा भातखंडे, सदस्य -  संजय साने आणि सदस्य - उज्ज्वल पाठारे उपस्थित होते.