Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️पेण तालुक्यातील शेतकऱी उठला पेटून ;आता सेझ चा सातबारा कोरा करून च सोडणार !

Responsive Ad Here
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
        22/9/2026 रोजी उल्काताई महाजन, नंदाताई म्हात्रे, राजन झेमसे, अभिशेट म्हात्रे,आणि बरेच कार्यकर्त्यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या सेझ बाधित शेतकऱ्यांच्या कालच्या प्रांत आॅफीस समोर झालेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या एल्गार हेच सांगुन जाते की, जसा सेझला हद्दपार केला त्याच प्रमाणे आता सातबारावरील सेझ चा नाव कमी करूनच सेझ बाधित शेतकरी गप्प बसतील हे कालच्या जमलेल्या पेटून उठलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना चे एकमेव ध्येय असेल.असे पहायला मिळाले. प्रशासनाने अनेक वर्षांपासून या मागणीला काल खरी सुरवात झाली, तरीही सद्य्या गणपती सणांचे दिवस असताना आंदोलन करण्या साठी  थोड्याच काळात शेतकऱ्यांनी इतकी मोठी उपस्थीती दाखवून प्रशासनाला एक प्रखर संदेश दिला.
       आर्थात सेझ ने जमीनी संपादन करून विसेक वर्ष झाले असुन अद्याप कोणताच प्रकल्प उभारण्यात आला नसून त्या जमिनी उगाच आडवून ठेवल्या असुन आजपर्यंत शेतकऱ्यांचे भाताच्या पीक न घेतल्यामुळे करोड रूपयांचे नुकसान झाल्याचे काही शेतकऱ्यांनी आपली खंत बोलून दाखविली. 
      आंदोलनाचे एकंदरीत चित्र पाहिल्यास काही विरोधी संघटनांकडून विरोधा साठी विरोध झाले.हे प्रकर्षाने जाणवत होते. पण आता लोकांना समजले आहे की शेतकऱ्यांच्या हीताचे कोण काम करतो आणि कोण आमच्या विरोधात आहे.
    विषेश करून लोकप्रतिनिधींनी या नेहमीच्याच प्रथे प्रमाणे आंदोलनाच्या जागी येऊन भेट देण्याचे टाळले .उलट त्यांचे पाठीराखे आंदोलनाचे छुपे वृत्तांकन करण्यासाठी आवर्जुन उपस्थित लावली.
      या आंदोलनात शेतकऱ्यांना व्यस्त असल्याचे औचित्य साधून  MMRDA च्या प्रशासनाने आवरे, व गोशठणे येथे आपले काही अधिकारी पाठवून जमीनीने सर्व्हे करण्यासाठी पाठविले होते , त्यांना तेथील शेतकऱ्यांनी शांतपणे निघुन जाण्यास सांगितले.
      शेवटी पेण, पनवेल, उरण तालुक्यातील सर्व शेतकऱी एकच आहेत. हे त्यांना दाखवून दिले.कारण पुढे नवनगर साठी 124 गावांची जमीन संपादन करण्यासाठी प्रशासनाचा हेतु आहेत.