Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️पेण येथिल गॅलेक्सि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे कणे गावचा निशांत पाटील याचा दुदैवी मृत्यु

Responsive Ad Here
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
      पेण शहरात एकही कार्यक्षम हास्पिटल नाही हे पेणवासीयांचे दुर्दैव आहे . निशांत पाटील वय वर्ष 24 या कणे गावातील युवकाचा गैलेक्सी मल्टिस्पेशालीस्ट या उद्यावत समजल्या जाणाऱ्या हास्पिटल मधे डाॅक्टरांच्या हालगर्जीपणा मुळे एका दुर्दैवी युवकाचा अंत झाला. अश्याच प्रकारे कणे गावातील या आगोदर सरपंच कै.हरिश्चंद्र पाटील व उपाध्य मॅडम या दोन कार्यतत्पर व कार्यक्षम दोन सरपंचांचा मृत्युही अश्याच डाॅक्टरांच्या हालगर्जी पणा मुळे झाला होता . पाहीले तर पेण हा मुख्यमंत्र्यांचा ग्रोथ सेंटर असले तरी आतपर्यंत या पेण शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुविधापूर्ण असे कोणतेच हास्पिटल नाही ; कारण तेथील हास्पिटल काही प्राथमिक उपचार करण्यात दोन तीन दिवस घालवतात आणि पेशंट सिरीयस झाला की त्याला पनवेल   तसेेच वाशी येथे न्यायचा सल्ला डाॅक्टर लोकांना देतात . तोपर्यंत खूप वेळ गेलेली असतो कारण सोपे आहे पेणकर किंवा खारेपाटातील सामान्य माणुस आजपर्यंत या वैद्यकीय क्षेत्रा विषयी कधीच मोर्चा आंदोलन केले नाही ज्या पेण शहरावर शंभर ते दिडशे गावांचा संपर्क येतो त्या शहरात सरकारी हास्पिटल हे गुरांच्या उपचारा पेक्षा गलिच्छ हास्पिटल आहे . आर्थात बर्‍याच वेळेस आम्हीच वृत्तपत्रात बातम्या देवून ही त्यात काहीच फरक पडला नाही . दादर येथील मुलगी सर्पदंशाने वारली कारण काय तर सर्पदंशावर व विंचुदंशावर इंजेक्शन हे सरकारी दवाखान्यात उपलब्ध असते.असा आजपर्यंत चा सामान्य माणसाचा समज होता .आर्थात दादर येथील मुलगी जाण्याचे कारण एकच की पेण येथे इंजेक्शन नव्हते तेथून तीला अलिबाग येथे शिफ्ट करण्यास सांगण्यात आले त्या दिरंगाई मुळे एका निरपराध मुलीचा मृत्यू झाला हीच मुलगी त्या डाॅक्टर ची असती तर कसं वाटलं असतं त्या संवेदना फक्त सामान्य माणसालाच उरल्यात. 
   पैसा वाईट नाही पण कमविण्याचा मार्ग सनदशीर मार्गाने किवा तो कमविण्याचा मार्ग चांगला असावा. एका काळी डाॅक्टर ला दुसर्‍या परमेश्वराचा रूप समजले जायचे पण आता तो काळ राहीला नाही. त्याला कारण ही तसेच आहे की लाखो करोड रूपये खर्चून डाॅक्टर च्या शिक्षणा पासुन ते हास्पिटल उभे राहील इथ पर्यंत हा खर्चाचा आकडा खूप मोठा जातो त्यामुळे डाॅक्टरांच्या डोळ्यासमोर तो पैसा उभा कसा करायचा हा यक्ष प्रश्न आत्ता पासुन उभा असतो म्हणून डाॅक्टर लोकांच्या वागण्यात बदल झाला आहे. त्या साठी सामान्य माणसाने रोगाची पार्श्वभूमी पाहून पनवेल किंवा वाशी , मुंबई येथे नेण्याचा त्वरित निर्णय घेतल्यास पेशंट बरा होईल यात वादच नाही.