Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️ ♦️ पावर लिफ्टिंग स्पर्धेत गडबच्या युवराज म्हात्रेला गोल्ड मेडल

Responsive Ad Here
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

    आय.आय.टी. मुंबई पवई येथे झालेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत रायगड तालुका पेण येथील गडब गावचा रहिवासी कु‌.युवराज रमेश म्हात्रेचा प्रथम क्रमांक
          कु. युवराज म्हात्रे आय.आय.टी. मुंबई पवई या राष्ट्रीय कॉलेजमध्ये एम्. टेक. चे (इंजिनियर ) शिक्षण घेत आहे. या अगोदर आय.आय.टी. आंध्र प्रदेश तिरुपती येथे प्रथम श्रेणीत बी. टेक चे (इंजिनियर )शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने शालेय स्तरापासून आत्तापर्यंत क्रीडा; शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. तो कारमेल  हायस्कूल पेण येथे दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. 
        शालेय स्तरावर नेट  बॉल; हॉलीबॉल; खेळात जिल्हास्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्र संघाचे लगोरी खेळात त्याने प्रतिनिधित्व केले होते. तो त्या खेळात राष्ट्रीय खेळाडू आहे. चित्रकला उत्तम आहे. बुद्धिबळ ;अभिनय; नृत्य; वक्तृत्व हा त्याचा आवडीचा छंद आहे. आतापर्यंत त्याने तालुका व जिल्हा स्तरावर अनेक पारितोषिक मिळवली आहेत. 
        आय.आय.टी. कॉलेज पवई मुंबई येथे २९ जुलै रोजी झालेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत एकूण २५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. युवराज ने ७३-८३ या वजनी गटात भाग घेतला होता. पावर लिफ्टिंग च्या तीन प्रकारांमध्ये एकूण ३७० किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवला व गोल्ड मेडलचा मानकरी ठरला.
     सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र वेट लिफ्टिंग संघाचे माजी कोच व राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू विजय सोनीग्रा यांच्या हस्ते करण्यात आले. 
        त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन चा वर्षा होत आहे.
तसेच गडब वासियांकडून व रायगडची शान परिवाराकडून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .