Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️खारपाडा येथे कै. मोरेश्वर भगत यांच्या ३१ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न♦️♦️

Responsive Ad Here

✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे



     .पेण पंचायत समितीचे माजी सभापती कै. मोरेश्वर भगत यांच्या ३१ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक, सामाजिक व सार्वजनिक वाचनालय, खारपाडा यांच्या वतीने घरगुती गणपती सजावट (मखर) स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा आणि मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा नुकताच आदरणीय खासदार सुनील तटकरे सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
   
   .कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. प्रज्वल रणजित पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना वाचनालयाचे सचिव कैलास रुठे यांनी केली.
  .यावेळी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष दयानंद भगत यांनी संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. मागील वर्षापासून नागरिकांच्या मागणीनुसार घरगुती गणपती मखर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी सहभाग घेतला. 

   . .अनेकांनी आकर्षक व सुंदर मखर सजावट केल्याने विजेत्यांची निवड करणे पंचकमिटीसमोर आव्हानात्मक ठरले. अखेर शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने सजावटीचे परीक्षण करून विजेत्यांची निवड करण्यात आली.
   मखर सजावट स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक – प्रभाग क्रमांक ४ मधील कु. साची देसले – सन्मानचिन्ह व रोख ₹२,५००
   
द्वितीय क्रमांक – प्रभाग क्रमांक १ मधील दीपेश राजाराम भगत – सन्मानचिन्ह व रोख ₹२,०००
  तृतीय क्रमांक – प्रभाग क्रमांक ३ मधील प्रितम रमेश ठाकूर – सन्मानचिन्ह व रोख ₹१,५००
    चतुर्थ क्रमांक – प्रभाग क्रमांक २ मधील आशिष बळीराम घरत – सन्मानचिन्ह व रोख ₹१,०००
    स्पर्धेत सहभागी झालेल्या गणेशभक्तांचाही उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह, शाल व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये विजय वासुदेव मोरे, भाग्योदय गणपत पाटील, प्रकाश मारुती ठाकूर आणि शंकर गणेश ठाकूर यांचा समावेश होता. तसेच माजी उपसरपंच हासुराम ठाकूर यांच्या वतीने प्रत्येकी ₹५०० रोख रक्कम देण्यात आली.
    
    यावेळी जयेश ठाकूर, प्रशांत पाटील, दीपेश भगत आणि साची देसले यांनी संस्थेचे आभार मानले.
 ...शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या कस्तुरी पाटील, श्रेया पाटील आणि प्रियाश घरत या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळा, खारपाडा येथील मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमास ज्येष्ठ नेते कृष्णा ठाकूर, दत्ता जाधव, नारायण पाटील, गणपत पाटील, धनंजय ठाकूर, माजी उपसरपंच महादेव भगत, माजी उपसरपंच हासुराम ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटेकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, दुष्मी शाखा अध्यक्ष भाई देसले, माजी सरपंच धनाजी भगत, पेण विधानसभा चिटणीस ललिता ठाकूर  यांच्यासह संस्था पदाधिकारी रमेश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, निशिकांत पाटील, रजनी पाटील, राजेश्री माळी, वसंत देसले, समाधान देसले, युवक तालुका चिटणीस विशाल देसले, किरण ठाकूर, विलास भगत, जयश्री घरत, भगवान घरत, विश्वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैक्षणिक संस्था अध्यक्ष माजी सरपंच रश्मी भगत, सीता पवार, नीलिमा भगत, सतीश भगत, अमित भगत, दर्शना ठाकूर वैशाली भगत कुंदा ठाकूर व चंदू पाटील राजेश्री पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.