Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️मातीच्या गणेशमूर्तींतून पाबळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश ; ♦️♦️नैसर्गिक रंगांचा वापर करून साकारल्या आकर्षक मूर्ती‎

Responsive Ad Here

✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

   गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पेण तालुक्यातील पाबळ केंद्र शाळेत ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका कल्याणी हेमंत पेरवी यांच्या संकल्पनेतुन उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माती आणि नैसर्गिक रंगांचा प्रभावी वापर करून आकर्षक, सुबक व रेखीव गणेशमूर्ती साकारल्या.
   
    माती मळण्यापासून ते मूर्तीला नैसर्गिक रंगांनी सजवण्यापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने केली. ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया, निसर्गाचे रक्षण करूया’ असा ठाम संदेश या बालकलाकारांनी आपल्या कलाकृतींमधून दिला. शाडू मातीचे महत्त्व, जलप्रदूषणाचे घातक परिणाम आणि निसर्गाचा समतोल राखण्याची गरज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
   हा उपक्रम रा.जी.प.शाळा पाबळ-पेण मुख्याध्यापिका कल्याणी पेरवी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण झाला. बालवयातच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार घडल्यास भविष्यात निसर्गपूरक संस्कृती अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सव श्रद्धेने साजरा करतानाच शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून जलप्रदूषण रोखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
   प्रत्यक्ष कृतीतून शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्वतःच्या कल्पकतेचा वापर करत विद्यार्थ्यांनी विविध रूपांतील सुंदर बाप्पांच्या मूर्ती घडवल्या.