✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यातील गडब गावात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखोल भागातील लोकांच्या घरांना पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे .
गडब गावातुन जाणाऱ्या नाल्याची पातळी पावसामुळे वाढली आणि अनेकांचे खूप नुकसान झाले हा नाल्यातील पावसाचा पाणी खाडी तसेच समुद्राला जाउन मिळतो परंतु जे एस डब्ल्यू कंपनीने टाकलेल्या पाईपलाईन मुळे पाणी अडवून राहून पुरस्थिती निर्माण झाली आहे दरवर्षी अनेकवेळा कंपनी प्रशासनाला सांगुन ती जुमानत नसल्याचे चित्र समोर आहे
त्यांच्या या मुजोर निर्णयामुळे गडब गावातील सखोल भागात असणाऱ्या घरांना पाणी शिरून अतोनात नुकसान होत आहे .
या सर्व कारणाची जबाबदारी ग्रामपंचातीवर पण आहे पण कोणतीही उपाययोजना करताना दिसते नाही त्या मुळे नागरिकांचे अतोनात हल होताना दिसतात यावर काहीतरी उपाययोजना करू असे दरवर्षी बोलले जाते पण तो दिवस आजतागायात उगवलेला नाही आणि यापुढेही उगवेल याची चिन्ह दिसत नाहीत सर्व गावातील पुढारी तसेच ग्रामपंचायत कमिटी आपली पोळी भाजण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे .