Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️खारपाडा टोलनाका येथे उद्या लक्षवेधी आंदोलन♦️♦️

Responsive Ad Here
✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
उद्या 02 जुलै 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता लक्षवेधी आंदोलन खारपाडा टोल नाक्यावर आहे ,भर पावसात आंदोलक भिजणार आहेत ...... कारण अनेकांच्या डोळ्यातील पाऊस त्यांनी पाहिला आहे.🌧️
   मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या प्रत्येक अपघातानंतर एका आईचा मुलगा गेला, एका पत्नीचा संसार उद्ध्वस्त झाला, एका लेकराच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं…
या वेदना पाहूनही जर आपण शांत बसलो, तर आपल्या शांततेलाही किंमत मोजावी लागेल.
म्हणून आम्ही भर पावसात उभे राहणार आहोत… 
थंडी, वारा, पाऊस सहन करणार आहोत…
कारण आमच्यासाठी हा फक्त टोलचा प्रश्न नाही…
हा माणसांच्या जीवाचा प्रश्न आहे.
आज आम्ही पावसात भिजू…
जेणेकरून उद्या कोणाच्याही घरात अश्रूंचा पाऊस पडू नये अस तुम्हा सर्वाना वाटत असेल तर तुम्ही पण येताय ना चला एकजुटीने लढू या आणि आंदोलनात सहभागी होऊया
       ना कोणता राजकीय पक्ष किवा संघटना तर एक सुजान नागरीक म्हणून एकजुटीने सर्वांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी नागरीकांना केला आहे .