Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगड च्या 14 वर्षाच्या ईव्यान गुप्ता ने ट्रॅप शाॅटगन नेमबाजीत मिळविले ब्रान्झ पदक

Responsive Ad Here
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

      .दिनांक 3 जुलै ते 5 जुलै 2026 या दरम्यान  झालेल्या 29 व्या S J Ezekiel  मेमोरियल चॅम्पियनशिप महाराष्ट्र रायफल संघटना आयोजीत  शाॅटगन नेमबाजीत ईव्यान गुप्ता ने  रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ब्रान्झ पदक मिळवून ऑल इंडिया शाॅटगन शुटींग स्पर्धेकरीता निवड झाली.
     त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष विजय खारकर ,राष्ट्रीय नेमबाज रायगड भुषण ,सेक्रेटरी व प्रशिक्षक किशन खारके,खजिनदार प्रितम पाटील, महेश फुलोरे अंबरनाथ.अजिंक्य चौधरी काटई ,कोच अलंकार कोळी,समाधान घोपरकर, सुरज थळे,किरण माळी,सुनील मढवी तसेच  आंतरराष्ट्रीय कोच रालस्टन कोयलो ह्यांच्या मार्गदर्शन मुळे त्याला हे एश संपादन करता आले,ईव्यान गुप्ता चे अभिनंदन करून सर्वानी पुढील नेमबाजी स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या किशन खारके ह्यानी सर्व समाजातील मुलांनी ज्यांचे वय 10 वर्षे वरील मुली व मुलांनी नेमबाजी करीता ईंडियन माॅडेल स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज उलवा नोड येथे असणा-या र्सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगड यांच्याकडे संपर्क साधावा असं आवाहन केले आहे