Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम म्हात्रे यांचे अकाली निधन!*

Responsive Ad Here
      *गडब/अवंतिका म्हात्रे*

 गेली 42 वर्ष शिवसेनेचे प्रखरपणे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते तुकाराम गजानन म्हात्रे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी अकाली निधन झाले.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी ठाम असणारे सच्चे आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पूर्ण पेण शहर आणि तालुक्यात ओळख असलेले तुकाराम म्हात्रे यांचा अकाली निधन होणे हे शिवसेनेसाठी नक्कीच दुःख व्यक्त करण्यासारखे आहे. पक्षाचं काम निष्ठेने करणारे आणि पक्षाशी कोणतेही प्रकारची प्रतारणा न करणारे लहांनापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्राचा नारा देऊन हाक मारून आपले मनोबल उंचावणारे तुकाराम म्हात्रे यांच्या अचानक जाण्याने शिवसेनेमध्ये अतिव दुःख निर्माण झाला आहे .
तुकाराम म्हात्रे यांची प्रसिद्ध चिक्कीवाले काका अशी ओळख होती सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारे काका आज आपल्यात नाहीत याची उणीव सर्व पेणकर आणि प्रवासी यांना भारणार आहे .
   त्यांचे अंत्यसंस्कार रात्री पेण येथील स्मशानभूमी मध्ये करण्यात आले .
यावेळी विष्णूभाई पाटील सुरेंद्र म्हात्रे, समीर म्हात्रे राजाराम पाटील, जगदिश ठाकूर, नरेश गावंड, प्रसाद भोईर, अशोक वर्तक अविनाश म्हात्रे, बाळू पाटील यांच्या सह शिवसैनिक शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय सहकार क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मोठा परिवार आहे .