.✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन कार्यालयाचे शुक्रवार दिनांक 26 जून रोजी संध्याकाळी 4 वाजता विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनिकेत तटकरे यांनी मन्नत मल्टीपर्पज असोसिएशनच्या अध्यक्षा मुस्कान झटाम व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महिला सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन ही एक संस्था असून ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच शासकीय व अर्ध शासकीय कार्यालयांना आवश्यक विकासात्मक सेवा,साहित्य व उपाय योजना एकाच छताखाली, मागणीनुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देते. तसेच मोठ्या प्रमाणावर आरोग्य प्रशिक्षण व जनजागृती मोहिमा राबवण्याची क्षमता या संस्थेकडे आहे.
मुस्कान रफिक झटाम या महिला सक्षमीकरणासाठी गेल्या दशकापासून कार्यरत आहेत. स्वतः ट्रेनिंग देण्यापासून केलेली सुरुवातीचे रूपांतर आज संस्थेमध्ये झालेले आहे. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीची संधी निर्माण करणे, कायदेविषयक जागृती, महिला बालकल्याण निगडीत सर्व बाबी, उच्च शिक्षित तज्ञ प्रशिक्षक यांच्या मार्फत मार्गदर्शन व गुणवत्ता यासाठी संस्था कटिबद्ध असणार आहे. या माध्यमातून हुन्नरी प्रशिक्षकांना देखील रोजगार मिळणार आहेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम देखील यापूर्वी राबवले गेलेले आहेत आणि पुढेही राबवण्यात येतील. स्किल डेव्हलपमेंट हब बनवण्याचा संस्थेचा मानस आहे असल्याचेही अध्यक्षा मुस्कान झटाम यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, जि.प. सभापती वैकुंठ पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील,डॉ.रत्नदीप गवळी,अमित नाईक,उमाताई मुंढे, दयानंद भगत,वसुधा पाटील,निळकंठ म्हात्रे,कलावती पाटील,मंगेश नेने,जितेंद्र ठाकूर,विकास पाटील,हबीब खोत, भरत शहा आदींसह पत्रकार बंधू उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.